1. कृषीपीडिया

Fertilizer Tips: उसापासून हवे भरपूर उत्पादन तर 'सिलिकॉन' आहे गरजेचे, वाचा याचे फायदे

पिकांना विविध अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. या बाबतीत जर आपण ऊस पिकाचा विचार केला तर खूप जास्त प्रमाणात अन्नद्रव्यांची या पिकाला गरज असते. या लेखात आपण ऊस पिकासाठी सिलिकॉन किती महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. जर आपण ऊसाचा विचार केला तर हेक्टरी 700 किलो सिलिकॉन हे पीक शोषून घेते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
silicon for cane crop

silicon for cane crop

पिकांना विविध अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. या बाबतीत जर आपण ऊस पिकाचा विचार केला तर खूप जास्त प्रमाणात अन्नद्रव्यांची या पिकाला गरज असते. या लेखात आपण ऊस पिकासाठी सिलिकॉन किती महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती घेणार आहोत.  जर आपण ऊसाचा विचार केला तर हेक्‍टरी 700 किलो सिलिकॉन हे पीक शोषून घेते.

नक्की वाचा:यावर्षी तूर या पिकाचे उत्पादन कसे वाढविता येईल? वाचा आणि फक्त हे काम करा

 ऊस आणि सिलिकॉन परस्पर संबंध

1- उसाच्या जोमदार वाढीसाठी- सिलिकॉन हे वनस्पतीच्या पानांच्या पेशीभित्तिकावर सिलिका जेल स्वरूपात साठून राहते. त्यामुळे पानांवर त्याचा जाड थर निर्माण होतो. या थरामुळे वनस्पतीमध्ये यांत्रिक शक्ती निर्माण होऊन वनस्पती सरळ वाढतात.

त्यामुळे ऊस पिकाचे जमिनीवर लोळण्याचे प्रमाण कमी होते. पाने सरळ वाढल्यामुळे एकमेकांची सावली पानांवर पडत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली होते व पिकाची उंची,खोडाची जाडी व फुटव्यांची संख्या वाढते. उसामध्ये साखर तयार होऊन त्याची साठवण होऊन त्याच स्वरूपात ती टिकून राहते व यासाठी सिलिकॉन महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:Chilli Crop: मिरचीच्या 'या' 10 जाती म्हणजेच शेतकरी बंधूंसाठी भरघोस उत्पन्नाची हमी, वाचा डिटेल्स

2- आर्थिक दृष्ट्या देखील फायदेशीर- सिलिकॉनचा उपयोगामुळे सिलिकॉन पुरवठा करण्यासाठी पारंपारिक तसेच वनस्पतीच्या अवशेषांचा फेरवापर व रासायनिक घटकांचा वापर केला जातो. 

या रासायनिक स्त्रोतांमध्ये कॅल्शियम सिलिकेट( 14 ते 19 टक्के सिलिकॉन व 17 टक्के पालाश) तसेच मॅग्नेशियम सिलिकेट(14.5 टक्के सिलिकॉन)त्यांचा समावेश होतो.

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शिफारस

उसामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या शिफारशीनुसार विचार केला तर त्यानुसार मध्यम खोल,काळ्या जमिनीत उसाची लागण आणि खोडव्याचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी कॅल्शियम

सिलिकेट 832 किलो प्रति हेक्‍टरी ऊस लागवडीच्या वेळेस एकदाच वापरले असता 400 किलो प्रति हेक्‍टरी सिलिकॉन ऊसाला मिळते व बगॅसऐशचा वापर केला तर सिलिकॉन उसासाठी उपलब्ध होऊ शकते. एवढेच नाही तर जिवाणू खतांचे मिक्स कल्चर वापरून उसाच्या पाचटाचे कंपोस्ट ऊसाला दिल्यास त्या माध्यमातून देखील ऊसाला सिलिकॉनचा पुरवठा होतो.

नक्की वाचा:ऊसाच्या या जाती रोग आणि कीड प्रतिरोधक आहेत; भरघोस उत्पादनही देतील

English Summary: important nutrients ingredient in cane crop is silicon and give more production Published on: 29 September 2022, 10:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters