1. कृषीपीडिया

शेतीमध्ये हंगामाला महत्व

आपल्या शेतीपिकांच्या चांगल्या वाढीसाठी त्याच बरोबर निरोगी शेती उत्पादन साठी योग्य वेळ महत्वाचे असते

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतीमध्ये हंगामाला महत्व

शेतीमध्ये हंगामाला महत्व

आपल्या शेतीपिकांच्या चांगल्या वाढीसाठी त्याच बरोबर निरोगी शेती उत्पादन साठी योग्य वेळ महत्वाचे असते त्या बरोबर हंगाम ही तेवढाच महत्त्वाचा आहे पिकांच्या लागवडीसाठी तसेच हंगामानुसार पिकांची निवड करणं तेवढेच महत्त्वाचअसतं. योग्यवेळी पिकानुसार त्यांना मानणाऱ्या हंगामात पिकांची लागवड झाल्यास कीड व रोगही नियंत्रणात राहण्यास मदत होते. पेरणीसाठी अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यापैकी महत्वाचं म्हणजे पेरणी साठी जमिनीमधला ओलाव्याचा विचार करून पिकांची पेरणी करण महत्वाचं आहे. कधी कधी शेतकरी वर्ग तर कोरड्या जमिन मधे पेरणी करतात.त्या पद्धती ला एक वेगळेच नांव आहे ते म्हणजे धुळपेरणी!जेव्हा मि हे स्वताच्या डोळ्यांनी पाहिले तर मि विचारलं हे पद्धती कोणती कि पाऊस नाही काही नाही तुम्ही कोरड्या जमिनीत बियाण्याची पेरणी केली कशी.मला एक वेगळं उत्तर मिळाले कि आपल्या पिकांना वाढीला योग्य वेळ व वातावरण मिळावा यासाठी 

आम्ही ही धूळ पेरणी पद्धत चा वापर केला ही पद्धत पुर्वी पासुन प्रचलित आहे. व महत्वाचं म्हणजे धूळ पेरणी म्हणजे पाऊसाचा अंदाज पाहून वेळेवर अशाअपेक्षेने कोरड्या मातीत बियाण्यांची पेरणी केरतात जेव्हा जमीन वाफशावर येण्याची वेळ आल्यावर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. या काळात बियाण्याची लागवड केल्यास बियाण्यांची उगवण चांगली होते व पेरणीही व्यवस्थित होण्यास मदत होते. याबरोबरच काही महत्त्वाच म्हणजे हवेतील व जमिनीतील तापमान हे तापमान पाहिजे त्या प्रमाणात कमी झाले नाही तर पिकाच्या रोपांना एक प्रकारचा मुळ्यानां शाॅक बसल्यासारखे होते बुरशी वाढल्याने मुळकुजव्या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. अशा अनेक पिकांमध्ये अनेक कारणांनी रोग व कीड जडत असतात. त्यामुळे योग्य हंगामातच पिकांची योग्य त्या पद्धतीने लागवड करणे महत्त्वाचे आहे. 

हंगामानुसार पिकांची लागवड होणे हे एक यशस्वी पिक लागवडीचे तंत्रज्ञान आहे.आता पाहू हंगाम प्रकार व महत्व खरीप, रब्बी व उन्हाळी हे तिनं हंगाम आहे त्याच बरोबर योग पिका वाना साठी योग्य हंगाम कोणता हे पाहू हा निसर्गाने ठरवलेल्या नियमाचा नियोजीत वेळ म्हणजे शेती चा हंगाम 

खरीप हा हंगाम हा जून ते ऑक्टोबर महीण्याचा कालावधी या कालावधीमध्ये असलेला बघावयास मिळतो. ज्या पिकांना हा कालावधी मानवतो त्याच पिकांची लागवड या काळात करावी. जेणेकरून त्यांना वातावरण अनुकूल असते आणि उत्पादनाच्या वाढीत चुकीचे परिणाम होत नाहीत. तसेच कीड व रोगही नियंत्रणात राहतात. या कालावधीमध्येसोयाबीन,मुग उळीद,भात, ज्वारी, बाजरी,तुर कापूस इत्यादी पिकांची लागवड केली जाते. या पिकांसाठी हा कालावधी अनुकूल समजला जातो. या कालावधीत शक्यतो अशा पिकांची लागवड केली जाते ज्या पिकांना कमी पाणी दिले तरीही त्यांच्यावर कुठलाही नुकसान कारक परिणाम होणार नाही.

योग्य वेळ योग्य नियोजन रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत असल्याचे समजले जाते. ज्या पिकांना थंड हमानात काहीही वाईट परिणाम होत नाही त्यांची लागवड या कालावधीत केली जाते. जी पिके थंडीला अपवाद असतात त्यांना थंड हवामान मानवते ती पिके रब्बी हंगामात घेतली जातात. थंडीमुळे त्यांना काहीही हानी नसते अशा पिकांची लागवड या हंगामात होत असते. करडई, गहू, हरभरा इत्यादी पिके मुख्य प्रमाणात या कालावधीत घेतली जातात.

 उन्हाळी हंगाम हा मार्च ते जून या कालावधीत असतो. या काळात ज्या पिकांना उन्हाळी हंगाम मानवतो त्यांची लागवड केली जाते. ज्या पिकांना उन्हाचा काहीही नुकसानकारक परिणाम होणार नाही याची काळजी घेवून या कालावधीत पिकांची लागवड केली जाते. कुठल्याही प्रकारचा कीड व रोगांचा प्रसार होवून काही नुकसान होणार नाही. याची खात्री करून कोणते पिक या कालावधीत घेणे योग्य आहे हे बघून पिकाची निवड करावी. या कालावधीत मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमुग, काकडी, दोडका, खरबूज, टरबूज इत्यादी पिकांची लागवड केली जाते.

या सर्व गोष्टी विचार करून आपन शेतीच नियोजन करु शकतो.

बलवान तर शेतकरी धनवान

 Save the soil all together

 

आपला सेवक

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil information

milindgode111@gmail.com

English Summary: Importance of season in agriculture Published on: 18 April 2022, 11:03 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters