1. कृषीपीडिया

Crop Tips:ऑगस्ट मध्ये तयार करा 'या' भाजीपाला पिकांची रोपवाटिका, बरोबर सापडेल बाजारभाव आणि मिळेल नफा

आपण जेव्हा पिकांची लागवड करतो, तेव्हा त्या पिकांची लागवडीचा एक कालावधी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे अचूक कालावधीत लागवड किंवा संबंधित पिकाचे रोपवाटिका तयार केली आणि निश्चित कालावधीत लागवड केली तर जेव्हा शेतमाल हातामध्ये येतो तेव्हा नक्कीच बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. त्यासाठी कालावधी खूप महत्त्वाचा असतो. हीच गोष्ट भाजीपाला पिकांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण अशाच एका भाजीपालावर्गीय पिकाची माहिती घेणार आहोत, त्याची रोपवाटिका ऑगस्टमध्ये केली तर नक्कीच पुढे बाजारपेठेत चांगला भाव मिळणे शक्य आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cauliflower nursury

cauliflower nursury

 आपण जेव्हा पिकांची लागवड करतो, तेव्हा त्या पिकांची लागवडीचा एक कालावधी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे अचूक कालावधीत लागवड किंवा संबंधित पिकाचे रोपवाटिका तयार केली आणि निश्चित कालावधीत लागवड केली तर जेव्हा शेतमाल हातामध्ये येतो तेव्हा नक्कीच बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. त्यासाठी कालावधी खूप महत्त्वाचा असतो. हीच गोष्ट भाजीपाला पिकांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण अशाच एका भाजीपालावर्गीय पिकाची माहिती घेणार आहोत, त्याची रोपवाटिका ऑगस्टमध्ये केली तर नक्कीच पुढे बाजारपेठेत चांगला भाव मिळणे शक्य आहे.

नक्की वाचा:Multi Layer Farming: शेतकरी मित्रांनो मल्टी लेयर फार्मिंगमधून घ्या लाखोंची कमाई; व्हाल मालामाल

 रब्बीतील सगळ्यात महत्त्वाचे भाजीपाला पीक फुलकोबी

 फुलकोबी हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून जर तुम्हाला या येत्या हिवाळा मध्ये फुल कोबीची लागवड करायची असेल तर ऑगस्ट मध्ये तिचे रोपवाटीका तयार करणे खूप गरजेचे आहे. या भाजीपाला पिकांसाठी चांगल्या जातींची निवड आणि चांगले व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी ठेवले तर फुलकोबी च्या माध्यमातून खूप चांगला नफा मिळणे शक्य आहे.

चांगल्या जातींची निवड जसे की, पूसा आश्विनी,पुसा कार्तिक आणि पुसा मेघना या सारख्या जाती खूप महत्त्वपूर्ण आहेत. लागवडीनंतर व्यवस्थित पद्धतीने किडींचे व्यवस्थापन आणि खत, पाणी व्यवस्थापन ठेवले तर अगदी कमी कालावधीत चांगला पैसा हातात येतो.

दरवर्षी एक अनुभव घेतला तर अगदी हिवाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा सुरू झाल्यानंतर फुलकोबीची चांगली मागणी बाजारपेठेत वाढते व चांगले भाव देखील मिळतात. त्या दृष्टिकोनातून कृषी शास्त्रज्ञांनी फुलकोबीच्या अनेक जाती विकसित केले आहेत.

नक्की वाचा:Agricultural Business: ऐकलं व्हयं! सर्पगंधा लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न; जाणून घ्या...

 थोडीशी काळजी चांगले उत्पादन

 फुलकोबी चा सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक जास्त ओलावा सहन करू शकत नाही. त्यामुळे पाणी देताना शेतात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवड आधी पूर्व मशागत करताना नांगरणी करून शंभर किलो शेणखत व त्यामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून सात ते आठ दिवसांनी शेतात टाकून द्यावे.

फुल कोबीची पुनर्लागवड करताना ती उंच वाफ्यामध्ये किंवा बांध करून करावी. म्हणजे आंतरमशागत करताना सोपे जाते व पिकात देखील पाणी साचत नाही. जर तुम्ही आजमीतिला रोपवाटिका टाकली तर 40 ते 45 दिवसात रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

फुलकोबी मध्ये विविध गोष्टींचे व्यवस्थापन करताना जरा काळजी घेणे आवश्यक असते कारण हवामान बदलाचा पटकन परिणाम या पिकावर होतो व कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान होऊ शकते.

त्यामुळे शिफारशीत कीटकनाशकांचा वापर आणि महत्वाचे म्हणजे सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला तर  विषमुक्त कोबीचे उत्पादन तर होईलच परंतु सेंद्रिय कीटकनाशकांमुळे खर्चदेखील कमी लागेल व उत्पन्न जास्त मिळेल.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो हिरवी भेंडी काय करताय लाल भेंडी करा आणि कमवा लाखों; बाजारात आहे ५०० रुपये किलो भाव

English Summary: if you ready cauliflower crop nursury in august can earn more profit Published on: 10 August 2022, 07:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters