मिरगाचा पाऊस पडतो आणि पेरणी सुरू होते. काही शेतकऱ्यांनी धुळपेरणी केलेली असते तर काही लागवडीच्या मागे लागतात. अनेकजन अनेक सल्ले घेऊन बाजारात उभे असतात. बांधावर येऊन आपल्या कंपनीच्या उत्पादन वापराने तुमच्या शेतात सोनं कसं तयार होईन, हे बेंबीच्या देठापासून सांगत राहातात. आमच्या कंपनीची सरकी लावल्याने तुमच्या झाडाला बोंडं किती येतील याचे चित्रंही त्यांच्याकडे तयारच असतात. मंग फवारणी कोणती करायची ? खत कोणते घालायचे ? याची महिनावार
यादीही त्याच्याकडे असते. आमचीच सोयाबीनची जात कशी जास्त शेंगा टाकते How our own soybean variety produces more pods याचे फोटो श्लोगन सह तयार असतात. मुग, उडीद, तूर, पपई, केळी, भाजीपाला, उसासाठी वेगवेगळ्या फवारण्या आणि खताची लांबलचक यादीच असते.
खोट्या कृषी निविष्ठांचा झाली पळापळी आणि बळीराजाचा मात्र त्रस्त
पॕकेजही तयार असतात त्यांच्याकडे . नामांकीत आणि रस्त्यालगत शेत पाहून एखांदा शेतकरी मोफत बी देऊन त्यांनी प्रचारासाठी तयारच असतो. त्यांच्या कंपनीची चित्रासह गाडीच शिवरात फिरत असते. त्यांच्या ह्या जाहिरात आणि प्रचाराकडे बघून अनेक शेतकरी स्वप्न
रंगवायला लागतात. पै नी पै गोळा करून वेळप्रसंगी दोनचार टक्क्याने उधार घेऊन पेरणी, लागवड करतात. मजेची गोष्ट म्हणजे बांधावर सांगायला आलेले अर्धेनीम्मे शेतकऱ्याचे पोरंच असतात. कोणी Bsc.Agri झालेला असतो तर कोणी GCT तर कोणी बोलण्यात पटाईत असतो म्हणून त्याच्याकडे ही पोष्ट आलेली असते. त्या त्या भागातला जनसंपर्क असलेल्या व्यक्तीवर ही जबाबदारी क्वचितच असते. पेरणीपासून खते, फवारणी करेपर्यत ही मंडळी शिवारभर, दुकानादुकानावर शेतकऱ्याच्या बांधावर
जातात. विशेष म्हणजे ही माणसं उत्पादनं विकत नाहीत. त्यांनी ती उत्पादनं प्रत्येक कृषी केंद्रावर ठेवलेली असतात. केंद्रातून विक्री झाली याचे टार्गेट त्यांना दिलेले असते. वगैरे वगैरे.रात्रंदिवस मेहनत घेऊन शेतकरी पिक जोपासतो.अस्मानी संकटाला तोंड देऊन वाढवतो. कर्ज काढूकाढू खर्च करतो. पिक जोमात येते. सांगितलेल्या आराखड्याच्या कोसो दूर ते असते.
निसर्गाला आणि नशीबाला दोष देऊन शेतकरी मुग गिळून गप्प राहातो. आहे परिस्थितीत समाधान मानून काढणीची वाट बघतो. दसरा दिवाळीचे दिवस जवळ येतात. पेरलेलं घरात येण्याची वेळ येते आणि अचानक ही सगळी शिवारभर फिरणारी माणसं गायब होतात. कुठे जातात याचा विचार करायला शेतकऱ्याला वेळही मिळत नाही. आणि सुरू होतो बाजाराचा दुसरा खेळ. जिथे माणसे बदललेली
असतात खेळ मात्र तोच असतो. शेतकऱ्यांना लुटण्याच्या. दसरा दिवाळीच्या अगोदर जागतिक पातळीवर प्रचंड हालचाली होतात. पाम तेलाचे भाव घसरले जातात. आयात निर्यातीचे प्रश्न ताजे होतात. सोन्याचे भाव मागे पुढे होतात. बॕकेचे रेपो दर बदलतात. CC च्या भानगडी सुरू होतात आणि जागतिक बाजारपेठेत नेमके काय होईल याची शाश्वती राहात नाही. सर्वसामान्याच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण होतात. ( हे सर्व सामान्य नेमके कोण हे अजूनही कोणाला कळाले नाहीत.
Share your comments