1. कृषीपीडिया

कपाशीतील बोंडे सडणे ओळख आणि उपाय

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग या प्रकारात मुख्यतः

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कपाशीतील बोंडे सडणे ओळख आणि उपाय

कपाशीतील बोंडे सडणे ओळख आणि उपाय

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. साधारणतः बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात. बहुतेकदा बोंडावर बुरशींची वाढ झाल्याचे दिसते.

उपाययोजना - बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात.Dried petals sticking to the bonda should be removed by hand if possible. यामुळे त्या ठिकाणी रोगकारक घटकांची वाढ होणार नाही. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.

पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडणे रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. 

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, प्रोपीनेब (७० डब्लूपी) ३ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

English Summary: Identification and Remedy of Boll Rot in Cotton Published on: 23 September 2022, 06:49 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters