1. कृषीपीडिया

संत्र्यावरील कोळशी ओळख व उपाय योजना

संत्र्यावरील कोळशी (Citrus sooty mold) संत्र्यावरील रोग नव्हे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
संत्र्यावरील कोळशी ओळख व उपाय योजना

संत्र्यावरील कोळशी ओळख व उपाय योजना

संत्र्यावरील कोळशी (Citrus sooty mold) संत्र्यावरील रोग नव्हे. परंतू, संत्रा झाडावरील पान, फळ व फांदीवरील काजळासारख्या काळ्या पावडरच्या अच्छादनामुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत थोडाफार अडथळा निर्माण होतो. त्याकारणाने पानगळ होते व झाडाच्या वाढिमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यासोबतच फळाच्या चवित किंवा रसात कोळशीमुळे फरक पडतो असे काहिच नाही. परंतू आजमितीस हा रोग ऐन परिपक्वतेच्या काळात दिसत असल्या कारणांमुळे व्यापारी वर्गाला भाव कमी करून मागण्याचे कारण तेवढे मिळाले आहे..हे निश्चित. 

(आमच्याच भाग भांडवलदार शेतकरी बांधवांच्या मागणी वरून 'निसर्ग फाऊंडेशन' द्वारे स्वस्त व परिणाम कारक ह्युमिक ॲसीड, फळमाशींचे सापळे, 'मासोळी, निम, करंज व पॅराफीन [खणीज] तेल', 'तेल विघटक', 'फळमाशीचे सापळे', 'सौर प्रकाश सापळे', 'पिवळे/निळे चिकट सापळे', 'हाड-मासाचे खत', 'निंबोळी चुरी', 'द्रवरूप जिप्सम' व 'जिप्सम पावडर' देण्यात येते.

हे ही वाचा - जिरेनियम शेती सेंद्रिय सॉईल मल्टिप्लायर साथीने वाढवा उत्पन्न

इतर जिल्ह्यातील पुरवठा संबंधित कोणताही खर्च घेण्यात येत नाही.)कोळशी आली म्हणजे तीला निमंत्रित करणारी किटके उदा. पांढरी माशी, मावा किंवा अजुन काही रस शोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात Large infestations of whiteflies, maggots or other sap-sucking insects

झाल्याचे हे लक्षण आहे. त्याकरता किडींना सोडून कोळशी रोखण्यात आपली क्रयशक्ती वाया घालवने म्हणजे साप गेल्यावर त्याच्या वरखंड्याला मारत बसन्याचा प्रकार आहे. त्यातच काही महाभाग मोठ्या प्रमाणात अतीप्रभावी बुरशीजन्य औषधींचा वापर करण्यास सांगून खऱ्या अर्थी शेतकर्यांची लुट करत असतात.आपल्या भागात यावेळेस आलेली कोळशी ही संत्र्यावरील पांढरी माशी (सिल्व्हर लीफ फ्लाय) व काळा मावा यामुळेच आली आहे. यामाशीचा 'चिकट स्त्राव' (Honey Dew) पानावर मोठ्या प्रमाणात सोडण्याच्या विशेषते मुळे कोळशीची वाढ आज झपाट्याने होते आहे. तेंव्हा पांढर्‍या माशीला कंट्रोल करण्याचे पर्याय शोधुया.

नियंत्रण कसे करावे - विवीध संशोधकांच्या संशोधन पत्रकांनुसार जगात आज अस्तित्वात असणाऱ्या अतीप्रभावी कीटक नाशकांच्या वापरानंतर सुद्धा पांढऱ्या माशीची रोकथाम ४०%च्या वर होवू शकत नाही. आणि अशा रसायनीक विषांविरूद्ध प्रतीकार क्षमता निर्माण होण्यास निसर्गाचा भरपूर आशिर्वाद तीला लाभला आहे. करिता नुसत्या फवारणी द्वारा पांढर्‍या माशीला अटोक्यात आणने निश्चितच आर्थिक दृष्ट्या हितावह नाही.या पांढर्‍या माशीला कंट्रोल करण्यासाठी जगात 'पिवळ्या चिकट सापळ्यांचा' वापर वाढीस लागला आहे. हा एकच पर्याय आजमितीस अतिशय स्वस्त, पर्यावरण पुरक आणि पांढर्‍या माशिची

रसायनाविरूद्ध प्रतीकार क्षमता कमी करण्या करिता जगातील विविध राष्ट्रांमध्ये केला जात आहे. एक A-4 आकाराचा (8 इंच×13इंच) चिकट सापळा अर्धा लाख पांढर्‍या माशा संपविण्याची क्षमता ठेवतो.तरीही किटक नाशकांची फवारणी करावयाचीच असल्यास महत्वपूर्ण अशा *पॅराफिनीक ऑईल (खनिज तेल) सोबत.अंतरप्रवाही किटकनाशक (डायफेनथ्युरॉन 50WP, फ्लोनीकॅमीड, पायरीप्रॉक्सीफेन 10% EC, ॲसीटामीप्रीड) + पायरेथ्रॉइड (डेल्टामेथ्रीन, अल्फामेथ्रीन किंवा मीओथ्रीन) अशी फवारणी उत्तमोत्तम राहिल.जगाच्या पाठीवर आज या किडीला आवर घालण्यास परोपजीवी किटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो

आहे. आपल्याकडे असे कार्य करणार्या लॅबची कमतरता आहे. म्हणूनच ते शक्य होत नाही.यासर्व उपाय योजने नंतर अशा कोळशीला दुर करन्या करिता.कोळशीचे डाग घालविण्यासाठी काय करावे.तीव्र वेगाच्या फवारनी पंपाच्या पाण्यात 'तेल-विघटक' किंवा भांडे घासन्या करिता वापरण्यात येणार्‍या लिक्विडचा वापर अतिशय प्रभावी ठरतो.त्याशिवाय मागील लेखात दिलेल्या मैदा/स्टार्च फवारणीचे तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे संशोधन सुद्धा कोळशीचे काळे डाग घालवीन्या करीता अतीशय महत्त्वपूर्ण आहे.परंतू, अगोदर पांढरी माशी रोखने आवश्यक आहे.

 

संकलन- पंकज काळे (M.Sc.Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती 

संपर्क - ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११ 

English Summary: Identification and Remedial Plan for Canker on Orange Published on: 13 September 2022, 07:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters