अमरावती विभागातील जवळपास सर्वच जिल्हांतर्गत पेरणी झालेल्या सोयाबीन किंवा कपाशीच्या नवीन अंकुराला बाधा पोहोचवणाऱ्या "वाणी किंवा पैसा" (Myriapoda) या सरपटणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवताणा दिसते आहे.(शेतकरी बांधवांच्या मागणी वरून 'निसर्ग फाऊंडेशन' द्वारे स्वस्त व परिणाम कारक फळमाशींचे सापळे, 'मासोळी, निम, करंज व पॅराफीन [खणीज] तेल', 'तेल विघटक', 'फळमाशीचे सापळे', 'सौर प्रकाश सापळे', 'पिवळे/निळे चिकट सापळे', 'हाड-मासाचे खत', 'निंबोळी चुरी', 'द्रवरूप जिप्सम' व 'जिप्सम पावडर' देण्यात येते. इतर जिल्ह्यातील पुरवठा संबंधित कोणताही खर्च घेण्यात येत नाही.)
वाणी किडींची नुकसानीची पातळी शेणखत किंवा काडी-कचरा कुजणाऱ्या शेत जमिनीत जास्त दिसून येते.* कारण या किडीची मादी एका वेळेस १०-१०० पर्यंत अंडी पुंजक्याचे स्वरूपात कुजणाऱ्या वनस्पतिजन्य अवशेषावर देत असते. अशी अंडी आठवड्या भरातच उबवतात व सरपटणारी ही किड समुहाने नवीन अंकुरांचा फडशा पाडते.हि किड खाद्य भागावर ओल चढवते व त्यानंतर आपल्या जबड्याने तो भाग खरवडते. त्यामुळेच असा खरवडलेला कोवळ्या पानाचा किंवा बुंद्याचा भाग रेशेदार दिसतो व रोपटे खाली कोलमडते. त्यामुळेच एकरी रोप संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते व दुबार पेरणीचे संकट उभे राहते.
शेतकरी बांधवांच्या मागणी वरून 'निसर्ग फाऊंडेशन' द्वारे स्वस्त व परिणाम कारक फळमाशींचे सापळे, 'मासोळी, निम, करंज व पॅराफीन [खणीज] तेल', 'तेल विघटक', 'फळमाशीचे सापळे', 'सौर प्रकाश सापळे', 'पिवळे/निळे चिकट सापळे', 'हाड-मासाचे खत', 'निंबोळी चुरी', 'द्रवरूप जिप्सम' व 'जिप्सम पावडर' देण्यात येते. इतर जिल्ह्यातील पुरवठा संबंधित कोणताही खर्च घेण्यात येत नाही.)वाणी किडींची नुकसानीची पातळी शेणखत किंवा काडी-कचरा कुजणाऱ्या शेत जमिनीत जास्त दिसून येते.* कारण या किडीची मादी एका वेळेस १०-१०० पर्यंत अंडी पुंजक्याचे स्वरूपात कुजणाऱ्या वनस्पतिजन्य अवशेषावर देत असते.
प्रतिबंधक किंवा किड प्रादुर्भावा वरील नियंत्रण - शेत बांधावरील किंवा काडी-कचरा, शेणखत असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून अंडी व किड नाशक प्रोफेनोफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस या किटकनाशकाचा प्रादुर्भावाचे सुरूवातीसच उपयोग करावा.प्रादुर्भावित क्षेत्रातील रोपांजवळ किंवा तासात फोरेट-१०% दाणेदार प्रती एकरी ३-४ किलो प्रमाणात मिसळून द्याल.त्याशिवाय निंबोळी तेला सोबत स्पर्शजन्य किटकनाशक जसे कि सायपरमेथ्रीन किंवा क्विनॉलफॉस चा जमीनी सहित रोपांवर सुद्धा फवारणी करावी.
संकलन -पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क - ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११
Share your comments