1. कृषीपीडिया

हळद पिकावरील कंदमाशीचे नियंत्रण कसे करावे?

KJ Maharashtra
KJ Maharashtra
हळद पिकावरील कंदमाशीचे नियंत्रण कसे करावे?

हळद पिकावरील कंदमाशीचे नियंत्रण कसे करावे?

एकात्मिक व्यवस्थापन:-

१) कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच फेनवेल डस्ट एकरी आठ किलो या प्रमाणात वापरावे.

२) क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.ली. किंवा डायमेथोएट (३०टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणात घेऊन जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.

३) उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. शिफारशीत केलेल्या वेळेवर हळदीची भरणी करावी.

४) हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सड़के कंद नष्ट करावेत.

५) लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे, बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. (बियाणे आंतरप्रवाही कीटकनाशक क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मि.ली. + बुरशीनाशक कार्बोडॅझीम ५० टक्के पाण्यात मिसळणारे २० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात घेऊन या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवावेत. बीजप्रक्रिया करताना बेणे किमान १५ ते १५मिनिटे द्रावणात बुडून राहतील याची दक्षता घ्यावी १० लीटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यासाठी वापरावे. )

६) हळद पिकानंतर पुन्हा हळद किवा आले यासारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांची फेरपालट करावी.

 

७) हेक्टरी सहा पसरट भांडी (माती अथवा प्लॅस्टिकची) वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १.५ लीटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून विशिष्ट असा वास बाहेर निघू लागल्यावर कंदमाश्या आकर्षित होऊन मरू लागतात. सदरची उपाययोजना अत्यंत प्रभावी, कमी खर्चीक व सहजरीत्या करण्यासारखी असल्याने सेंद्रिय हळद उत्पादनामध्ये ती महत्त्वाची भूमिका निभावणारी आहे.

उपाययोजना कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी आहे.

 

सुदर्शन जमादार,शहादा,नंदूरबार

संतोष मोहिते,बुलढाणा

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters