1. कृषीपीडिया

पृथ्वीचे कार्य कसे चालते? व तिचे स्वरुप काय?

पृथ्वीबद्दल माहिती घेताना आज घटकेस असंख्य आकडेवारी उपलब्ध आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पृथ्वीचे कार्य कसे चालते? व तिचे स्वरुप काय?

पृथ्वीचे कार्य कसे चालते? व तिचे स्वरुप काय?

पृथ्वीबद्दल माहिती घेताना आज घटकेस असंख्य आकडेवारी उपलब्ध आहे. एखाद्या वस्तूचे जसे आपण मोजमाप घेतो, रंगरूप न्याहाळतो, उघडता येत असेल तर आत डोकावतो, तसे करण्याचा मानवाचा सतत प्रयत्न चालूच आहे पण या प्रयत्नाला फक्त बाह्यतः यश मिळाले आहे.

निळ्याशार रंगाचा आपला ग्रह, त्यावरचे पाण्याचे प्रवाह, पांढरे ढग या सर्वांची छायाचित्रे घेऊन झाली आहेत. उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रांना दूरचित्रवाणीवर बघून बघून त्यातही आज नाविन्य वाटेनासे झाले आहे. पृथ्वीसभोवतालचे वातावरण, येथील तापमान यांचीही इत्यंभूत आकडेवारी आज आपल्या हातात आहे. एवढेच नव्हे तर एक अन्य ग्रह व संपूर्ण सूर्यमालिका यांचा तौलनिक अभ्यासही करून झाला आहे. पण पृथ्वीच्या पोटात काय दडले आहे, याचा पत्ता आज आपल्याला फक्त अनुमानानेच काढावा लागतो. पृथ्वीचा गाभा अत्यंत तप्त पण घन लोखंड व निकेल या धातूंनी बनला असावा. 

त्यानंतरचे मध्यकवच हे तप्त द्रवरूप खडकांनी बनलेले आहे बाह्यकवच म्हणजेच पृष्ठभाग फक्त आपल्या परिचयाचा आहे. पृष्ठभाग तरी पूर्णत: नजरेला पडतो काय? फक्त ३० टक्के पृष्ठभाग आपण पाहू शकतो. अन्य सर्व पुन्हा पाण्यातच गडप झाला आहे.

जमिनीवर पृथ्वीचे बाह्यकवच २० ते ३० किलोमीटर जाड असून जेथे जेथे ते समुद्राने व्यापले आहे तेथे अनेक ठिकाणी ही जोडी जेमतेम ५ ते ८ किलोमीटर एवढीच आहे. यानंतर सुरू होते ते मध्यकवच, मोहोरोविसिक पातळी या नावाने कवचांना विभागणारी ही रेषा ओळखली जाते. तप्त द्रवरूप खडकांचे हे मध्यकवच (Mantle) २९०० किलोमीटरपर्यंत खोल आहे. लाव्हारसाचा उद्भव येथूनच होतो. त्याच्या आतील बाजूस द्रव घन गाभा आहे. या विभाजक रेषेला गुटेनबर्गची रेषा म्हणतात. पृष्ठभागाच्या खाली ५,१५० किलोमीटर अंतरावर द्रवरूप गाभाही संपून घन गाभा सुरू होतो पृथ्वीचा मध्य ६,३८५ किलोमीटर खोल आहे. 

घन गाभ्याचे तापमान ८,००० सेंटिग्रेड असावे. सर्वसाधारण अंदाजानुसार दर किलोमीटर खोलीवर एका सेंटीग्रेडने तापमान वाढत जाते. समुद्रातळाशी अनेक ठिकाणी बाह्य कवच पातळ असल्याने तेथून लाव्हारस ज्वालामुखीच्या स्वरूपात बाहेर पडतो. तसेच अंतर्गत हालचालींमुळे संपूर्ण खंडाची जमीनच काही भाग सरकत जाऊन तिची फेररचना घडत जाते. हे पुरातन काळापासून चालू असून यापुढेही चालणार आहे. किंबहुना याच प्रकारातून हिमालयाची निर्मिती झाली आहे.

पृथ्वीचा आकार आपल्याला प्रचंड वाटत असला तरी सूर्य आकाराने आपल्या पृथ्वीपेक्षा अनेकपट मोठा आहे. ग्रहमालिकेत पृथ्वीचा क्रमांक आकारमानाने पाचवा लागतो. पृथ्वीची काही मोजमापे अशी आहेत: १५ कोटी चौरस किलोमीटरचा पृष्ठभाग जमिनीने व्यापला आहे तर पस्तीस कोटी चौरस किलोमीटरवर समुद्रच आहेत. पृथ्वीचे वजन ५.९८ १०^२६ किलोग्रॅम एवढे भरेल. 

सर्वात उंच शिखर म्हणजे माऊंट एव्हरेस्ट हे ८,४४८ मीटरवर उंच आहे तर समुद्राखाली ११,०३५ मीटरवर पॅसिफिक महासागरात मारिआनाचा खंदक आहे.विषुववृत्ताशी व्यास १२,७५६ किलोमीटर आहे. तर ध्रुवापाशी तो कमी म्हणजे १२,७१३ किलोमीटरच भरतो.पृथ्वीच्या वातावरणात ७८ टक्के नत्र, २१ टक्के प्राणवायू व एक टक्का अन्य वायूंचा समावेश होतो. वनस्पती पृथ्वीवर वाढू लागल्या व प्राणवायूचे प्रमाण वाढत गेले, असा एक कयास आहे.पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा २३ तास ५६ मिनिट ४ सेकंदात पूर्ण करते. तर सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे व ९।। सेकंदात संपवते. पृथ्वीला एकच उपग्रह म्हणजे चंद्र आहे.

पृथ्वी हा एकच ग्रह सूर्याच्या ग्रहमालिकेत सजीवांच्या वास्तव्यासाठी सध्या उपयुक्त आहे.

 

प्रसारक : दिपक तरवडे

 संकलक : प्रविण सरवदे, कराड

सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून

English Summary: How does the earth work? And what is its nature? Published on: 22 April 2022, 08:20 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters