मातीचा धंदा मातीच देणार नाहीतर काय मोती थोडेच देईल.
पाहा जरा वडा तळला रुपया हातात, चहा उकळला रुपया हातात,
चुना मळला रुपया हातात, स्क्रु पान्हा पक्कड फिरवली की रुपया हातात, तराजुत माल मोजला की रुपया हातात स्टेथो लावला कि रुपया हातात. पम्पचर काढ़लं रुपया हातात. टायरात हवा भरली रूपया हातात चपलेला टाका घातला पैसा हातात.
ईस्तरी केली पैसा हातात.कुणाचीही हजामत केली पैसा हातात. देशी विकली रूपया हातात. तीर्थ हातावर टेकवलं रुपयादक्षिणा ताटांत. टोल नाक्यावर टाळी वाजवली दहा रुपये हातात.दोन-चार मंत्र उच्चारले , पाचशे हातात दोन तास सरकारी काम केले अख्खा पगार हातात. भंगार विकले पैसा हातात शौचालयात संडास केली तरी दोन रुपये हातात.
अहो, भीक मागीतली तरी रुपया हातात.सारं कसं नगदी नगदी नगदी रोख रोख रोख. उधार नाहीच उशिरा तर कधीच नाही. इकडं हातात पैसा ताब्यात. पण शेतीची व्यथा पहा काम घाम गळे पर्यंत करा अन् सहा महीने वाट पहा
शेती नागरलं पैसा नाही, शेत वखरलं पैसा नाही, शेत पेरलं पैसा नाही, धान उगवलं पैसा नाही, रात्री बेरात्री पाणी दिलं पैसा नाही, अनवाणी शेत राखलं पैसा नाही, महागा-मोलाचं खत घातलं पैसा नाही, पीक आलं पैसा नाही, माल पार मोंढ्यांत घातला पैसा हातात नाही शेतकरीनो.नांगरल्या पासून माल घाले पर्यंत पैसा नाही.
मग झक मारायला शेती करायची का ? सगळ्यां धंद्यांत नगदी पैसा. शेतीत सहा महिन्यांनी. विचार करा मराठ्यांनो शेती तत्काळ बंद करा. जगाची चिंता करू नका.ज्या हरामखोरांनी उत्तम शेती सांगीतली त्यांना भर चौकात नागडं करुन रुमड्याने किंवा भरीव बांबू ने ठोका.तुम्हांला उत्तम शेती सांगीतली आणि स्वत: उत्तम नोकरी लाटली. करा कोणताही धंदा तरच हाती जमेल रोजच चंदा.जर शेती कराल तर बांधावरच्या झाडांवर लटकाल.किती जरी पिकली शेती.
तरीही नाही जाणार साडेसाती. पिक कितीही आलं जोरदारं योग्य भाव कधीच नाही मिळणांर शेतीचा कितीही आला पैका मोठा.त्याला आहेत सतराशे साठ वाटा.नाही शेतक-यांला कधीच सुखाची झोप.
सगळेच त्याला राबवून घेती नाही देत कसलाच रोब.
जगाचा पोशिंदा सदा उपाशीआयते कुत्रे रोज तुपाशी.
Share your comments