1. कृषीपीडिया

Cultivation: 'या' वनस्पतीची करा एकदा लागवड, कमवाल लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

शेतीमध्ये वेगवेगळे पिकाच्या लागवडीचा प्रयोग शेतकरी निरंतर करत असताना त्या माध्यमातून विविध तंत्रज्ञानाची ओळख तर होतेच परंतु शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये देखील वाढ होत आहे.कारण आता काही नवीन पीक पद्धती किंवा पिके शेतकरी घेत आहेत, ते नगदी पिके असल्यामुळे बरेच शेतकरी आता अशा पिकांची लागवड करण्याकडे भर देत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gulkhera cultivation

gulkhera cultivation

 शेतीमध्ये  वेगवेगळे पिकाच्या लागवडीचा प्रयोग शेतकरी निरंतर करत असताना त्या माध्यमातून विविध तंत्रज्ञानाची ओळख तर होतेच परंतु शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये देखील वाढ होत आहे.कारण आता काही नवीन पीक पद्धती किंवा पिके शेतकरी घेत आहेत, ते नगदी पिके असल्यामुळे बरेच शेतकरी आता अशा पिकांची लागवड करण्याकडे भर देत आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींचे उत्पादन घेण्याकडे आता शेतकरी वळत असून त्या माध्यमातून आर्थिक प्रगती करीत आहे.आता आपण या लेखामध्ये गुलखैरा या पिकाबद्दल माहिती घेणार असून याचे पाने, या वनस्पतीच्या बिया त्याचे मूळ तसेच विविध भाग बाजारपेठेत विकले जातात

.अजूनही महाराष्ट्र मध्ये गुलखैरा शेती बद्दल पुरेशी माहिती नाही. या पिकाची सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या आंतरपीक म्हणून देखील लागवड करू शकतात.याचा उपयोग औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.त्यामुळे गुळखेडा फुलाची लागवड करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे.

नक्की वाचा:Floriculture: फुलशेतीत 'या' फुलाची करा एकदा लागवड, मिळवा तीन ते चार वर्ष उत्पन्न, मिळेल बक्कळ नफा

गुलखेरा लागवडीच्या माध्यमातून कमाई

 जर याचा बाजारपेठेतील किमतीचा विचार केला तर काही अहवालानुसार, दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हे विकले जाते. तीस गुंठा लागवड केली तर पाच क्विंटल गूलखेराचे उत्पादन मिळते. या भावाने जर विचार केला तर एका बिघात आपण पन्नास ते साठ हजार रुपये कमवू शकतो.

या पिकाच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा का याची पेरणी केली तर दुसऱ्यांदा लावण्यासाठी बाजारातून बियाणे विकत घेण्याची गरज पडत नाही कारण या पिकाच्या बिया पुन्हा लागवड करता येतात.

याच्या लागवड कालावधीचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात लागवड करणे उत्तम असते व एप्रिल ते मे महिन्यात झाडाची पाने व देठ सुकून शेतातच पडतात व नंतर ते गोळा करावे लागतात.

नक्की वाचा:काय म्हणता! निवडुंग लागवडीच्या माध्यमातून देखील लाखो रुपये कमवता येतात? जाणून घेऊ संपूर्ण माहिती

 याचा वापर कुठे होतो?

 गुलखेराचे फुले, पाने आणि देठ यांचे युनानी औषध बनवण्यासाठी उपयोग केला जातो. याच्या फुलाचा उपयोग मर्दानी शक्तीच्या औषधांमध्ये देखील होतो.

एवढेच नाही तर गुलखेराच्या फुलापासून बनवलेले औषध ताप,खोकला आणि इतर अनेक आजारांवर खूप उपयुक्त ठरते. या वनस्पतीची लागवड पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये तर होतेच परंतु आपल्या भारतात देखील आता हळूहळू वेग धरत असून उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात शेतकरी याची लागवड करत आहेत.

उत्तर प्रदेश राज्यातील हर्दोई, उन्नाव तसेच कन्नोज या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात गुलखेराची लागवड करून चांगली कमाई करत आहेत.

नक्की वाचा:भारीच की! शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा शेती आणि 3 महिन्यात लखपती व्हा, जाणून घ्या..

English Summary: gulkhera cultivation is so profitable and give more income to farmer Published on: 28 July 2022, 03:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters