उन्हाळी भुईमुगाचे अधिकात अधिक उत्पादन घेण्यासाठी मध्यम प्रकारची, चांगली निचरा होणारी, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित चिकन मातीची, सेंद्रिय पदार्थाने परिपूर्ण असलेली व साधारण त्या जमिनीचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असणारी ( त्यातही सामू 6.5 असल्यास उत्तम समजावा) जमीन आदर्श मानल्या जाते. भुईमूग पिकाच्या मुळाचे जाळे साधारणत पंधरा सेंटीमीटर खोल जमिनीत असते व भुईमूग पिकाच्या मुळांवर गाठी असतात या गाठीच्या योग्य वाढीसाठी हवा खेळती राहणारी योग्य निचरा होणारी जमीन केव्हाही योग्य असते याऊलट अतिशय भारी चिकन माती युक्त, चिकट व कडक होणाऱ्या तसेच ज्या जमिनीमध्ये निचरा चांगला होत नाही.
पेरणीपूर्व माती परीक्षण करून माती परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावर तसेच जमिनीचे भौतिक जैविक व रासायनिक गुणधर्म लक्षात घेऊन प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन उन्हाळी भुईमूग लागवड करण्यासाठी जमीन निवडणे केव्हाही हिताचे असते प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन उन्हाळी भुईमूग लागवड करण्यासाठी जमीन निवडणे केव्हाही हिताचे असते.
उन्हाळी भुईमूग ज्या जमिनीत लागवड करायचा आहे ती जमीन किमान तीन वर्षातून एकदा पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नागरणी करून नागणी नंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या वखर पाळीपूर्वी हेक्टरी पाच टन म्हणजेच एकरी दोन टन म्हणजेच किमान एकरी दहा ते बारा गाड्या
चांगले कुजलेले शेणखत जमिनीत टाकून शेवटची व खत वखराची पाळी देऊन जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. शेणखत वापरताना चांगले कुजलेले शेणखत वापरावे म्हणजे पुढे होणाऱ्या हुमणी किडीचा प्रादुर्भावास प्रतिबंध मिळेल. पूर्वमशागत करताना ज्या लागवडीच्या पद्धतीचा अंगीकार करावयाचा आहे त्या शिफारशीत पद्धतीप्रमाणे उदाहरणार्थ सपाट वाफा पद्धत, अरुंद सरी-वरंबा पद्धत किंवा रुंद सरी वरंबा पद्धत यापैकी योग्य पद्धतीची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निवड करून
आपले गरजे नुसार संबंधित उन्हाळी भुईमूग लागवड पद्धतीप्रमाणे पूर्वमशागत करून जमीन तयार करावी.तसेच ज्या जमिनीमध्ये निचरा चांगला होत नाही.प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन उन्हाळी भुईमूग लागवड करण्यासाठी जमीन निवडणे केव्हाही हिताचे असते.
Share your comments