शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग लागवड करण्याकरिता काही महत्त्वाच्या शिफारशीत वानाची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत. आपले स्थानिक गरजेनुसार या वाणाची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच योग्य त्या उन्हाळी भुईमुगाच्या वानाची लागवडीसाठी निवड करावी. या या वाणाची गुणवैशिष्ट्ये याठिकाणी दिली असली तरी एकाच वानात सर्व गुणधर्म आपल्याला प्राप्त होतील असे नाही त्यामुळे जमीन प्रकार, हवामान, आपल्याकडे असणाऱ्या व्यवस्थापन सुविधा व बाजारपेठ या सर्व बाबींचा विचार करून प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊनच उन्हाळी भुईमुगाच्या वाणाची निवड करावी. सर्वसाधारण उन्हाळी भुईमुगाच्या वनाची गुणवैशिष्ट्ये लक्षात यावी याकरिता या वाणाची वैशिष्ट्ये या ठिकाणी विशद केली आहे.
(1) टीएजी - 24 :
हे उन्हाळी भुईमूग पिकाचे वाण वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडते. या वानाचा परिपक्वता कालावधी उन्हाळी हंगामात साधारणता 110 ते 115 दिवस असून शेंगातील दाण्याचा उतारा जवळजवळ 70 ते 72 टक्के आहे. या वानात भुईमुगाच्या 100 दाण्याचे वजन 35 ते 45 ग्रॅम व तेलाचा उतारा 50 ते 51 टक्के असतो. या वाणाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 24 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. हा वान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
(2) टीजी - 26 :
उन्हाळी भुईमुगाचा हा वान वाढीच्या प्रकारच्या नुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. या वानाचा परिपक्वता कालावधी साधारणतः 110 ते 115 दिवस आहे. या वानात शेंगातील दाण्याचा उतारा 72 ते 76 टक्के एवढा आहे. या वानाची सरासरी उत्पादकता 25 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे. या वाहनात 100 दाण्याचे वजन 35 ते 45 ग्रॅम तर तेलाचा उतारा 50 ते 51 टक्के एवढा दिला आहे. हा उन्हाळी भुईमूग पिकाचा वाण संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
(3) फुले उन्नती (आर. एच आर .जी 60 83) :
हा उन्हाळी भुईमुगाचा वान वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. या वानाचा परिपक्वता कालावधी साधारणता 120 ते 125 दिवस एवढा असून सरासरी उत्पादकता हेक्टरी 30 ते 35 क्विंटल एवढी दिली आहे. हा वाण संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
(5) एस. बी. 11:
शेतकरी बंधूंनो हा उन्हाळी भुईमूग पिकाचा वान फार जुना म्हणजे 1965 यावर्षी शिफारशीत केलेला वान आहे. हा वान वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. हा वान साधारणतः 115 ते 120 दिवसांत परिपक्व होतो व या वाणाचीसरासरी हेक्टरी उत्पादकता फार कमी म्हणजे 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे सर्वसाधारणपणे अलीकडील काळात अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा वाण तेवढा उत्पादन देत नसल्यामुळे पसंतीस उतरत नाही त्यामुळे या वाणाची फक्त माहिती असावी या अनुषंगाने ही बाब नमूद केली आहे. शक्यतो या या वाणाची लागवड टाळून उन्हाळी हंगामात अधिकात अधिक उत्पादन देणार्या तसेच इतर गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या वाणाची निवड करावी.
टीप :
(१) वर निर्देशित वाणाची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन आपले गरजे नुसार प्रत्यक्ष तज्ञांशी सल्लामसलत करून आपले स्थानिक परिस्थितीनुसार सर्व बाबीचा सर्वांगीण विचार करून योग्य त्या वाणाची निवड करावी.
(२) वर निर्देशित वाणाचे बियाण्याच्या संदर्भात संबंधित कृषी विद्यापीठ, शेतकऱ्यांच्या बीज उत्पादक कंपन्या, महाबीज, शासन मान्यता प्राप्त इतर बियाणे कंपनी यांच्याकडे बियाणे संदर्भात विचारपूस करावी तसेच त्यांच्या कडे उपलब्धतेनुसार दर्जेदार प्रमाणित बियाण्याचा लागवडीसाठी वापर करा.
Share your comments