1. कृषीपीडिया

ऊसाची एफआरपी यंदाही एकरकमीच

राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
ऊसाची एफआरपी यंदाही एकरकमीच

ऊसाची एफआरपी यंदाही एकरकमीच

राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 19) झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या हंगामात निर्माण झालेला अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि यंदा उसाचे वाढलेले क्षेत्र, याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गळीत हंगामात 10.25 टक्के बेसिक

उतार्‍यासाठी उसाला प्रतिटन 3,050 रुपये एफआरपी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.The decision to give FRP was also taken in this meeting. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसर्‍या स्थानी असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या उद्योगाचे अभिनंदन केले.

माकड कधीच आजारी पडत नाही याची कारणे वाचाच

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरेमंत्री

दादा भुसे, सहकारमंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, आ. प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, खा. धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी

गाळप घेतले. शेतकर्‍यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. 98 टक्के एफआरपी अदा करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. यंदाचा गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित आहे. गाळप होणार्‍या उसासाठी 10.25 टक्के बेसिक उतार्‍यासाठी प्रतिमेट्रिक टन 3,050 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

 

Msguru sugarcane farming

Mr. Mukund Sabale

9022989440.

English Summary: FRP of sugarcane is same this year too Published on: 07 October 2022, 08:01 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters