शेतकरी बंधूंनो भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानाची भुईमूग पिकाच्या वाढीस गरज असते व हे समशीतोष्ण हवामान भुईमूग पिकाला उन्हाळ्यात प्राप्त होते. पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्यामुळेच हे पीक उन्हाळी हंगामात घेतले जात असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते व अधिक उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमुगाच्या जोमदार वाढीसाठी साधारणतः 24 ते 27 डिग्री से. ग्रे. तापमानाची गरज असते व तापमान 20 डिग्री से. ग्रे. पेक्षा कमी झाल्यास शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते.
उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाच्या पेरणीची वेळ साधने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याकरता काही बाबी समजून घेणे गरजेचे आहे. उन्हाळी भुईमूग हे दिवस लहान व रात्र मोठी अशा वातावरणात फुलणारे पिक आहे.
उन्हाळी भुईमूग पिकाला जास्त फुलोरा येण्याकरता दिवस फार मोठा नको. दिवस लाबला तर मी भुईमुगाची नुसती शाकीय वाढ होत राहते. उन्हाळी भुईमूग पिकाला फुले लागण्याचा उत्तम काळ म्हणजे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा होय. साधारणता उन्हाळी भुईमूग उगवणीनंतर 30 ते 32 दिवसांनी फुलोऱ्यावर येतो व साधारणत पाच ते सात दिवस चागली उगवन होण्याकरता लागतात. मंगेश साधारणता उन्हाळी भुईमूग पेरणीनंतर 35 ते 37 दिवसानंतर फुलोऱ्यावर येतो व फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 35 दिवस वजा केले तर 15 ते 20 जानेवारी हा कालावधी उन्हाळी भुईमुगाच्या पेरणी साठी उत्तम आहे परंतु उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यापूर्वी थंडी (तापमान) हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
हे जो लक्षात घेतला पाहिजे. साधारणत 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान थंडी नसेल तर पेरणी करावी परंतु अतिशय जास्त थंडी असल्यास अशा थंडीत भुईमूग पेरणी थोडी पुढे ढकलता येते कारण उन्हाळी भुईमुगाची उगवन चागली होण्याकरता जमिनीचे तापमान 18 डिग्री से. ग्रे. ते 27 डिग्री से. ग्रे. च्या दरम्यान असणे अत्यंत आवश्यक आहे. वातावरणातील तापमानात वाढ झाली झाली तरी जमीन हळूहळू उबदार होते याची नोंद घ्यावी. अतिशय थंडीत भुईमुगाची पेरणी झाल्यास त्याचा भुईमुगाच्या बियाण्यांच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होऊन उगवणशक्ती कमी होते. टी. ए. जी.24 सारखा 110 ते 115 दिवसांत परिपक्व होणारा उन्हाळी भुईमूग पिकाचा वान 10 फेब्रुवारी पर्यंत पेरून सुद्धा उत्पादन घेता येते परंतु उशिरा पेरणी केल्यास उन्हाळी भुईमुगाचे पीक मान्सूनपूर्व पावसात सापडून नुकसान होणार नाही याची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
साधारणता 15 जानेवारी उशिरात उशिरा 10 फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी भुईमूग पेरणी करण्याची शिफारस आहे परंतु हवामानातील सर्व घटक लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार योग्य पेरणीची वेळ साधल्यास उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळू शकते.
Share your comments