1. कृषीपीडिया

जमिनीचा पोत ओळखण्याची 'फिल' पद्धत आणि काळा मातीची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर माहिती

पिकांची लागवड करताना जमीन,जमिनीतील मातीचा प्रकार,मातीची सुपीकताइत्यादी गोष्टींचा विचार केला जातो.बऱ्याचदा अमुक एखाद्या पिकासाठी कोणत्या प्रकारची माती उपयोगी ठरते जेणेकरून या मातीमध्ये पिकाचे उत्पादन जास्त येईल प्रकारचा देखील सल्ला बऱ्याच जणांकडून दिला जातो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक

 पिकांची लागवड करताना जमीन,जमिनीतील मातीचा प्रकार,मातीची सुपीकताइत्यादी गोष्टींचा विचार केला जातो.बऱ्याचदा अमुक एखाद्या पिकासाठी कोणत्या प्रकारची माती उपयोगी ठरते जेणेकरून या मातीमध्ये पिकाचे उत्पादन जास्त येईल प्रकारचा देखील सल्ला बऱ्याच जणांकडून दिला जातो.

खरे पाहायला गेले तर मातीची उत्पादन क्षमता ही तिच्या सुपीकतेवर अवलंबून असते. परंतु असे असले तरीमातीच्या प्रकाराचा देखील फारसा फरक पीक उत्पादन वाढीवर होतो. आपल्याला माहीत आहेच की मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये गाळाची माती, वालुकामय मृदा, तांबडी मृदा आणि काळी माती एक आदींचा यामध्ये समावेश आहे. या प्रकारांमध्ये काळी माती ही कुठली पिकांसाठी उपयुक्त समजले जाते. तसे पाहायला गेले तर प्रत्येक मातीच्या प्रकाराचेत्यांचे त्यांचे काहीतरी वैशिष्ट्य आणि गुणधर्म आहेत.या लेखामध्ये आपण काळा मातीची वैशिष्ट्ये व त्यामध्ये येणारी पिके यांची माहिती घेऊ.

 काळ्या मातीचे महत्त्वाची वैशिष्ट्ये

 जर आपण काळ्या मातीचा विचार केला तर की पिकांच्या उत्पादनासाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते. या प्रकारच्या मातीमध्ये लोह, चुना तसेच मॅग्नेशियम आणि अल्लुमिनियम ही पोषक घटक जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे काळा मातीचा वापर पिकांच्या उत्पादनासाठी उत्तम समजला जातो.  एवढेच नाही तर काळ्या जमीनीत नायट्रोजन,फॉस्फरस आणि पोटॅशचे प्रमाण देखील इतर प्रकारच्या मातीच्या तुलनेत  यामध्ये खूपच जास्त असते.

 काळ्यामातीत या पिकांची लागवड ठरते फायद्याचे

1- काळ्या मातीला कापसाचे मृदा असा देखील म्हणतात. कारण या मातीमध्ये कापूस पीक फार चांगल्या प्रमाणात येते व उत्पादन देखील चांगले मिळते.

2- भात शेती साठी देखील काळीमाती उपयुक्त असून जास्त उत्पादन मिळते.

3-मसूर,हरभरा इत्यादी कडधान्ये वर्गीय पिकांची साठी काळी माती चांगली असते.

4-तसेच गहू, इतर प्रकारचे तृणधान्य, तांदूळ, ज्वारी, ऊस तसेच सूर्यफूल, भुईमूग, तंबाखू, बाजरी, लिंबूवर्गीय फळे, तसेच तेलबिया वर्गीय पिके आणि भाजीपाल्यासाठी तर काळा मातीचा वापर उत्तम ठरतो.

5-तसेच फळबागांमध्ये आंबा,पेरू आणि केळी पिकासाठी अतिशय उत्तम असते.

 मातीचा पोत ओळखण्याची 'फील'पद्धत

 मातीचा पोत जर ओळखायचा  असेल तर एक साधी आणि सोपी पद्धत आहे तिला म्हणतात फील पद्धत. यामध्ये हाताचा अंगठा व तर्जनी मध्ये माती दाबली असतात मातीच्या स्पर्शज्ञानाने त्यातील वाळू,  पोयटा आणि मृत्तिका यांचे प्रमाण अंदाजाने ओळखणे म्हणजे जमिनीचा पोत ओळखणे होय.यासाठी ओलसर माती घ्यावी व ती दोन बोटांमध्ये थोडासा ताकदीने वळावी. मातीमध्ये मृत्तिका कणांचे प्रमाण जास्त असल्यास मातीचा आकार लांबट होतो. त्याला चिकटपणा सुद्धा जास्त असतो. वाळूचे प्रमाण जास्त असल्यास हाताला खरखरीतपणा जाणवतो.

मातीमध्ये जर पोयटाचे प्रमाण जास्त असेल तर पिठूळ अथवा गुळगुळीतपणा जाणवतो. परंतु त्याचा चिकटपणा मृत्तिकाकनापेक्षा कमी वाळूकणापेक्षा जास्त असतो.या पद्धतीने शेतात सुद्धा जमिनीचा पोत ओळखता येतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेत शेतीमध्ये क्रांती, मुलांनी फुलवली शेती..

नक्की वाचा:शरद पवार ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात

नक्की वाचा:क्रिकेटनंतर कडकनाथ! धोनीचे पोल्ट्री व्यवसायात पदार्पण, जाणून घेऊ कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्ये

English Summary: feel method is useful for identify soil kind and charactrastic of black soil Published on: 26 April 2022, 03:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters