1. कृषीपीडिया

शेती व नैसर्गिक वातावरण

आपल्या सर्वांना पडलेला एक सर्वसाधारण प्रश्न असतो की ही कृषी तंत्रज्ञान सांगते की जमीन तर जिवंत आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेती व नैसर्गिक वातावरण

शेती व नैसर्गिक वातावरण

आपल्या सर्वांना पडलेला एक सर्वसाधारण प्रश्न असतो की ही कृषी तंत्रज्ञान सांगते की जमीन तर जिवंत आहे तर उन्हाळ्यात एवढ्या उन्हात जिवाणू जातात कोठे व त्या जीवाणू चे काय होते किंवा मरत का नाही परंतु ते असे होतच नाही. कारण उन्हाळ्यामध्ये जीवाणू हे सुप्तावस्थेत जातात खूप पाऊस पडला की पुन्हा जिवाणू आपल्या अवस्थेत ऍक्टिव होतात.

पहीला मृगाचा पहिला पाऊस पडला की आपल्याला मातीचा वेगळाच वास येतो कारण हे जीवाणू त्यांच्या शरीरातून काही हर्मोंस श्रवतात 

 व कार्यरत होतात. हे सर्व नैसर्गिक आहे. आपण एक उदाहरण घेऊ, समजा उन्हाळ्यात एखाद्या पिकाची लागवड केली आणि जमिनीत पाणी दिले तर असा वास येत नाही कारण जोपर्यंत नैसर्गिकरीत्या वातावरण तयार होऊन पाऊस पडत नाही तोपर्यंत या प्रकारचा वास येत नाही हा निसर्गाचा नियम आहे. आता आपण उपयुक्त जीवाणूचे फायदे कोणते ते बघूया

झाड हे खत तसेचे तसे घेऊ शकत नाही त्यासाठी त्या खतावर जीवाणू मार्फत प्रक्रिया होऊन ते खत उपलब्ध स्वरूपात जिवाणू तयार करतात 

 व ते उपलब्ध स्वरूपातील अन्न हे पीक घेतात. आपण दिलेल्या रासायनिक खतांचा वापर करायचा असेल तर आपली जमीन उपयुक्त जिवाणूनी समृद्ध असली पाहिजे अन्यथा आपण दिलेल्या १०० किलो DAP मध्ये असलेला ४६ किलो फॉस्फरस पैकी फक्त ६ किलो फॉस्फरस लागू होईल व ४० किलो फॉस्फरस हा(fixed form) फिक्स फॉममध्ये जाईल व उत्पादनात प्रचंड घट येईल. त्यासाठी आपल्याला( P.S.B) फॉस्फरस सोलबीलिझिंग बॅक्टरिया देऊन आपण पूर्ण फॉस्फरस उपयोगात घेऊ शकतो. 

 हे फक्त फॉस्फरसचे उदाहरण दिले. असे 16 प्रकारच्या प्रत्येक अन्नद्रव्यांमध्ये घडते.जमिनीत जिवाणू चे संवर्धन करण्यासाठी सेंद्रिय खतांचा योग्य वापर व जिवाणू कल्चर यांचा वापर करून आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो व उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत करू शकतो हेही तेवढंच खरं.

 

Mission agriculture soil information

milindgode111@gmail.com

Milind j gode

विचार बदला जिवन बदलेल

English Summary: Farming and natural weather Published on: 23 February 2022, 01:52 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters