1. कृषीपीडिया

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच शेतीवरील प्रेम आणि भूमिका, एकदा वाचाच थक्क व्हाल

मंडळी आजचा लेख खुप छान आहे आपन वाचाल अशी मला खात्री आहे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेती व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका एकदा वाचाच थक्क व्हाल

शेती व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका एकदा वाचाच थक्क व्हाल

मंडळी आजचा लेख खुप छान आहे आपन वाचाल अशी मला खात्री आहे प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुढील लेखनास सुरुवात करतो. आपल्या माहीत असेल नसेल तरी आठवण करून देतो की डॉ बाबासाहेबआंबेडकर यांना शेतकरी व शेती बद्दल जान होती यांना गावामध्ये समाज व्यवस्थेची जानीव होती. त्याच प्रमाणे शेतीबद्दलही ज्ञान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.त्या महानायकाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या सोडवून उपाययोजना करण्यासाठी शेतीचा बारकाईने विचार केला.महत्वाचं म्हणजे ही पहीली व्यक्ती आहे की शेतकर्याच्या हीताचा व सिंचनाबाबतीत बोलत होते शेतकऱ्याला शेती ला सिंचनासाठी पाणी मिळणे गरजेचे आहे. सिंचना शिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही. शेती ही पूर्णत: निसर्गागावरती अवलंबून आहे. पाऊस पडला नाही तर दुष्काळ निर्माण होतो. 

दुष्काळात शेतकरी स्वतःच्या कुटूंबातील सदस्यासह जीवन जगण्याचा संघर्ष करतो, अशा स्थितीत त्याला जीवन जगणे कठीण होते, ही वास्तविकता डॉ. बाबासाहेबांनी दाखवून दिली. त्यांनी कृषी क्षेत्रात काही बदल व्हायला हवा व एका बाजूला कृषी विषयक सर्व समस्याचा अभ्यास केला. तर दुसऱ्या बाजूला त्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून इंग्रज सत्तेच्या विरोधात आंदोलन केले.बाबासाहेबांनी विद्यार्थी जीवनापासूनच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

साहेब विद्यार्थी असतांनाच त्यांनी जर्नल ऑफ द इंडियन इकॉनॉमिक्स मध्ये देशातील लहान लहान शेतजमीन आणि त्यावरील उपाय हा शोध प्रबंध प्रकाशीत केला, त्यामध्ये त्यांनी आपले शेती विषयक मत व्यक्त केले की जमिनीचे होणारे तुकडा पद्धती मुळे शेतीचा आकार लहान लहान होऊन त्या कारणाने शेतीच्या उत्पादन क्षमतेत घट होते.

शेतीचं तुकडा पद्धती हे अल्प उत्पादनाचे मुख्य कारण आहे, जमिनीचा आकारमान हा लहान लहान तुकडयात विभागल्यामुळे भांडवल, श्रम, यंत्र सामग्रीचा वापर लहान शेतकऱ्याला करता येत नाही. कमी शेतीत मोठी गुंतवणूक करणे शेतकऱ्याला परवडत नाही, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची संकल्पना मांडली होती. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही शर्तीवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. सामूहिक शेती करण्यासाठी शासनाने कायदे तयार करावेत. तसेच शेत पिकांची रचना, कृषीमालाची विक्री, शेतमालाचे हमी भाव या बाबतीत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यामुळे आर्थिक विषमता कमी होईल. मागणी व पुरवठ्याच्या नियमानुसार शेतीच्या मालाची विक्री होईल. त्यातुन शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळेल. मोठ्या आकारमानाने असलेल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, ज्यामुळे शेतीचा विकास सुलभ होईल असे मत मांडले. 

बाबासाहेब यांनी आपल्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रातील बदलासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आंदोलन उभे केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी केलेला संघर्ष शेतकरी वर्गाला आजही प्रेरणा देणारा आहे.खोती पध्दतीत शेतकरी आणि शासन यांच्यातील जो मध्यस्थ असतो तो म्हणजे 'खोत' होय. ही नियुक्ती ब्रिटीश शासनाने केलेली होती. खोत शासनाची ठराविक रक्कम कर म्हणून गोळा करुन दिल्यानंतर तो स्वतःच्या मर्जीनुसार शेतकऱ्यांचे शोषण करीत होता.त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीचा विकास कसा करता येऊ शकतो व शेतकऱ्यांच्या जिवनात नवचैतन्य कसे निर्माण करता येऊ शकते हे अभ्यासातून मांडले होते.थोडक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आजही देशाच्या विविध सामाजिक व आर्थिक समस्या सोडविण्यासाठी महत्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव, समाज व देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. आज देशासमोर दारिद्रय, बेरोजगारी, सामाजिक विषमता, जातीव्यवस्था, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, या सर्व समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

 

विचार बदला जिवन बदलेल

मिलिंद जि गोदे

Save the soil all together

milindgode111@gmail.com

English Summary: Farming and Dr. Babasaheb Ambedkar statment and love one time read this Published on: 13 April 2022, 04:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters