आधुनिक तंत्रज्ञानाचा पारंपरिक शेतीला बराच फायदा झाला आहे. मात्र दिवसेंदिवस वाढता रासायनिक खतांचा वापर शेतजमीनीवर गंभीर परिणाम करत आहे. जमिनीचा पोत, उत्पादकता यांचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे आवश्यक असेल तेवढेच खत देणं गरजेचं आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा वरचेवर मृदू परीक्षण अर्थात माती परीक्षण केले जाईल. आजच्या लेखात आपण माती परीक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत.
भरघोस पिके येण्यासाठी मातीची भूमिका महत्वाची ठरते. कारण मातीमधून मिळणारे जिवाणू तसेच पोषक घटक पिकांना योग्य मात्रेत नायट्रोजन पुरवते. जे पिकांच्या विकासासाठी कार्य करते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही तुमच्या शेतात कोणत्याही पिकाची लागवड करत असता तेंव्हा त्या मातीचे परीक्षण जरूर करा. मातीचे वरच्यावर केलेले परीक्षण पिकांच्या उत्पादन क्षमतेत वृद्धी करेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देईल.
मातीच्या परीक्षणानासाठी सॅम्पल तयार करण्याआधी कोणत्या गोष्टी पहाव्यात
मातीचा नमुना पिके पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय,रासायनिक खते देण्यापूर्वी एक महिना आधी करावा जर सेंद्रिय किंवा रासायनिक खते दिले असतील तर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा,उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्यांना विशिष्ट क्रमांक द्यावेत. मातीचे नमुने गोळा करताना गुरे बसण्याची व झाडाखालची,खते व कचरा टाकण्याची,दलदल व घराजवळची,पाण्याच्या पाटाखालील बांधजवळची, झाडाझुडपे असणारी जागा निवडू नये.
नमुना गोळा करण्यासाठी मातीत व्ही अक्षराच्या आकृतिप्रमाणे ३० सेंटीमीटर खोल खड्डा खोदावा व त्यानंतर खड्डयातील माती बाहेर काढून मातीचा नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची असलेली माती काढावी. अशा पद्धतीने सर्व खड्डातून माती जमा करावी आणि गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे ४ समान भाग करावे. तसे केल्यानंतर समोरासमोरील दोन भागाची माती काढून उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा ४ समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. अशाप्रकारे तुमचे मातीचे सॅम्पल तयार झाले. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. आता ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी.
त्यानंतर नमुना क्रमांक,नमुना घेतल्याची तारीख,गाव आणि पोस्ट,तालुका,जिल्हा, सर्व्हे किंवा गट क्रमांक,नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र,बागायत किंवा जिरायत, मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात, पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात, मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये), जमिनीचा उतार किंवा सपाट, जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर, पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट, माती नमुना गोळा करणा-याची सही. या माहितीसह तो नमुना पाठवावा.
महत्वाच्या बातम्या;
माळवाडीच्या शेतकऱ्याची परदेशी पाहुण्याला भुरळ, शेती बघण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात
Custerd Apple Variety : भारतातील सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या सीताफळच्या जाती ; वाचा याविषयी
बातमी कामाची! पीएम किसान योजनेत मोठा बदल, आता याच शेतकऱ्यांना मिळणार पैसे...
Share your comments