1. फलोत्पादन

पिके आणि फळबागेसाठी माती परीक्षण करायचे असेल तर अशा पद्धतीने घ्यावा मातीचा नमुना; वाचा आणि घ्या जाणून

आपणास कल्पना असेलच की भारत सरकारच्या केंद्रीय व कृषी शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिनांक 13 एप्रिल 2021 पासून जमीन सुपोषण व संरक्षण जनजागरण अभियान राबविण्यासाठी सुरुवात केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soil testing is so crucial in crop production

soil testing is so crucial in crop production

आपणास कल्पना असेलच की भारत सरकारच्या केंद्रीय व कृषी शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिनांक 13 एप्रिल 2021 पासून जमीन सुपोषण व संरक्षण जनजागरण अभियान राबविण्यासाठी सुरुवात केली आहे.

या अभियानाचा महत्त्वाचा उद्देश लक्षात घेऊन माती परीक्षण संदर्भातील मूलभूत बाबी शेतकरी बंधन पर्यंत पोहोचून माती परीक्षणाच्या आधारावरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून पिकाचे पोषण केले जावे व जमिनीचे आरोग्य अबाधित राहिले पाहिजे.

 शेतकरी बंधूंनो माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी खरीप हंगामात आपल्या स्वतःच्या जमिनीतील माती नमुन्याच परीक्षण करून खताचा किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन पीकात करणं गरजेचे आहे. त्यामुळे माती परीक्षण याविषयी ठळक बाबी जाणून घेऊया.

  1. A) माती परीक्षण म्हणजे काय :

 आपल्या स्वतःच्या शेतजमिनीतील पीक पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी प्रतिनिधिक माती नमुना काढून प्रयोगशाळेत प्रामुख्याने या माती नमुन्यातच रासायनिक पृथक्करण करून त्यातील मुख्य अन्नद्रव्ये दुय्यम,( नत्र स्फुरद व पालाश) दुय्यम अन्नद्रव्य ( कॅल्शियम मॅग्नेशियम व गंधक ) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य ( लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम इ.) बाबींचा प्रमाण तपासणे होय. या परीक्षणात जमिनीचा सामू,विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींची सुद्धा तपासणी होते. आवश्यक असल्यास जमिनीची भौतिक व जैविक गुणधर्माची तपासणी सुद्धा केली जाऊ शकते.

नक्की वाचा:अतिथीसारखा आला आहे हरभऱ्यावर हा नवीन रोग; वाचा या रोगाची कारणे आणि लक्षणे

  1. B) माती परीक्षणामुळे होणारे फायदे:

1) माती परिक्षण केल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या आधारावर पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात रासायनिक खत देणं सोपं होतं त्यामुळे अनावश्यक खताचा वापर कमी होऊन खर्चाच्या खर्चात बचत होते.

2) जमिनीची नेमकी सुपीकता, उपलब्ध असलेले जमिनीतील क्षार, सेंद्रिय कर्ब सामू इत्यादी बाबींची माहिती मिळते त्यामुळे जमिनीची नेमकी सुपीकता टिकून ठेवण्यासाठी तसेच समस्यायुक्त जमिनीत शिफारशीत उपायोजना करण्यासाठी नियोजन करता येते.

3) माती परीक्षणाच्या आधारावर खताचे व्यवस्थापन झाल्यामुळे खताच्या मात्रेत बचत होतेउत्पादन खर्चात कपात होते.

4) जमिनीतील काही घटकांच्या उपलब्धतेनुसार / माती परीक्षण अहवालाच्या आधारावर पिकाचे योग्य नियोजन करता येते उदाहरणार्थ संत्रा वर्गीय पिकात 10 टक्केच्या वर चुनखडीचे प्रमाण जमिनीत आढळल्यास अशा जमिनीत संत्रा वर्गीय पिके घेणे टाळावे असा सल्ला दिला जातो व पर्यायी पिकाचा सल्ला दिला जातो.

  1. C) माती परीक्षणा करिता नमुना केव्हा घ्यावा?

1) मातीचा नमुना वर्षभर केव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो परंतु सर्वसाधारण पिकाकरिता रब्बी पिकाची काढणी झाल्यानंतर उन्हाळ्यात मार्च ते मे या कालावधीत शेणखत टाकण्यापूर्वी जमिनीतून मातीचा नमुना काढणे योग्य ठरते

2) जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर खते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकाच्या दोन ओळी मधून घ्यावा.

नक्की वाचा:ब्रिटिश शास्त्रज्ञांचा दावा! शाकाहारी लोकांपेक्षा मांसाहार करणाऱ्यांमध्ये 14% कॅन्सरचा धोका जास्त, वाचा सविस्तर माहिती

  1. D) कुठला किंवा केव्हा मातीचा नमुना घेणे टाळावे?

1) नुकतेच खत टाकलेल्या जमिनी, खोलगट भाग, पाणथळ जागा,झाडाखालील जमीन, बांधजवळील जागा, शेणखताच्या ढिगार्‍याजवळील जागा, शेतातील बांधकामा जवळील परिसर, कंपोस्ट खताच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेऊ नये.

2) कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खताच्या मात्रे नंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये.

3) पिकाची नागरनी केल्यानंतर नमुना घेणे टाळावे.

  1. E) सर्वसाधारण पिकासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा?

1) प्रथम आपल्या स्वतःच्या शेताची पाहणी करून आपले वेगवेगळे जमिनीचे किती प्रकार पडतात ते निश्चित करा उदाहरणार्थ हलकी भारी मध्यम या प्रकारच्या वेगळ्या जमिनी करता स्वतंत्र वेगळा नमुना घ्यावयाचा आहेहे लक्षात घ्या.

2) नमुना घ्यावयाच्या शेतामध्ये स्वतः फिरून शेतात जमिनीचे चार कोपरे सोडून झाडाखालचा भाग सोडून जनावरे बांधत असलेला भाग सोडून आत मध्ये संपूर्ण शेत प्राथमिक रूपात समाविष्ट केले जाईल. याप्रमाणे शेतजमिनीचे काल्पनिक आठ-दहा वार्ड पाडा प्रत्येक वार्डात म्हणजे भागात नमुना घ्यावयाच्या जागेवरील काडीकचरा बाजूला करून सर्वसाधारण म्हणजे सोयाबीन तूर उडीद मूग ज्वारी हे पीक करतात पंधरा ते वीस सेंटीमीटर तर कपाशी ऊस केळी या पिकांकरिता 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा करा म्हणजे साधारणत: आठ ते दहा खड्डे तयार होतील.

 या प्रत्येक खड्ड्याच्या आतल्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खुरपीच्या सहाय्याने खरडून प्रति खड्डा साधारणत: एक किलो गोळा झालेली माती एका स्वच्छ प्लास्टिकच्या कागदावर टाका चांगली मिसळा ओली असल्यास नंतर या मातीचे चार समान भाग करा व समोरासमोरील दोन भाग काढून टाका उरलेले दोन भाग एकत्र मिसळा ही प्रक्रिया साधारणत: अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत करा. उरलेली अंदाजे अर्धा किलो माती स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरा पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा नंतर ही माती मान्यताप्राप्त माती परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवा. साधारण पाणी नमुना गोळा करणे व प्रयोगशाळेत पाठवणे यात दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ नसावा.

नक्की वाचा:नको रे बाबा असे दिवस! लंका होती सोन्याची परंतु आज पोट भरण्यासाठी लागणाऱ्या अन्नासाठी रांगेत मरत आहेत नागरिक

  1. F) फळबागेसाठी मातीचा नमुना कसा घ्यावा:

 फळझाडाची नमुने जमिनीत खोल जात असल्यामुळे उथळ जमिनी फळबागेसाठी अयोग्य ठरतात. फळबागेसाठी नमुना घेताना खड्ड्याच्या उभ्या छेदाप्रमाणे पहिल्या एक फूटातील त्याच्याखाली तिसऱ्या एक फुटातील व त्याच्या खाली चौथ्या एक फुटातीलखड्ड्यातील माती वेगवेगळी गोळा करावी वसे चार फूटाआतील चार नमुने एकच नमुना म्हणून प्रत्येक नमुन्यात लेबल टाकून व जमिनीतील खोलीचा उल्लेख करून खालील निदर्शित माहिती पत्रिका सहित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे.    

English Summary: this is method very crucial for take sample for soil testing in fruit and crop cultivation Published on: 30 March 2022, 12:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters