शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी असते. पाण्यावरच सगळं काही अवलंबून आहे. असे असताना आता एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकरात विहीर खोदून पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला आहे. १० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता असलेली महाकाय विहीर खोदून त्यांनी दुष्काळावर कायमची मात केली आहे. यामुळे त्यांचे राज्यात चर्चा आहे. मारुती बजगुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कमी पडतो, असे असले तरी शेती पडीक राहू नये म्हणून शेतकरी आगळेवेगळे प्रयोग करीत आहेत. असाच एक प्रयोग पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे यांनी केला. यांची १२ एकर शेती आहे. सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. यामुळे ते याबाबत विचार करत होते.
त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरवले. सुरुवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत त्यांनी तीन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यास सुरुवात केली. त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. या कामासाठी सहा महिने दररोज ८० मजूर राबत होते. तसेच माती व दगड काढण्यासाठी १० ट्रक लावले होते. यामुळे परिसरात याची चर्चा सुरु होती.
आता सलग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पाण्याची चिंता नाही. शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड दिल्याने उत्पन्न वाढेल, असे या शेतकऱ्याने म्हटले आहे. या विहिरीतून निघालेला मुरुम त्यांनी महामार्गासाठी दिला आहे. त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले आहेत. १० हजार कोटी लीटर क्षमतेची महाराष्ट्रातील ही एकमेव विहीर आहे. यामुळे त्यांनी शेतात आता फळबागा देखील लावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
कृषी प्रदर्शने ठरताहेत आधुनिक तंत्रज्ञानाची दालने, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कसा होतो फायदा
सरकारने ठरवलंय शेतकऱ्यांना उबजारी येऊ द्यायचं नाही!! आता डीएपी खत दीडशे रुपयांनी महागले
काल वाह वाह आज थू थू!! पुणे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रताप उघड..
Share your comments