जमीन अन्नपूर्णा आहे. समस्त सृष्टीला मागील करोडे वर्षे जगवत आहे. यापुढेही लखो करोडो वर्षे ती जगवायला पूर्णपणे समर्थ आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाचे उत्पादन काढण्याकरिता जमिनीत बाहेरून काहीही आणून टाकण्याची गरज नाही. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे प्रणेते कृषी ऋषी सुभाष पालेकर यांनी बार्शी येथील शिबिरात हे नैसर्गिक शेतीचे सिद्धांत सांगितले होते त्या प्रमाणे बार्शीचे एक शेतकरी आपली शेती कसतात त्यानी या संदर्भात कथन केलेलं अनुभव अत्यंत उत्सववर्धक आहेत.
सिद्धांत १ –पिकांच्या अन्न, पाणी घेणार्या केशमुळ्यांना जमिनीतील उपलब्ध झालेली अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात आणि पाहिजे त्या प्रमाणात व पाहिजे त्या वेळी तयार करून करून पोचविण्यासाठी काम करणारी अनेकविध सजीवांची यंत्रणा निर्माण करून ती कार्यरत केली की,तिला नैसर्गिक शेती म्हणता येते.
हे सूक्ष्मजीव, गांडूळे, जीवजंतू, जिवाणू जमिनीत देशी गायीचे शेणमूत्र टाकले व जमिनीत वापसा निर्माण करून जमिनीवर आच्छादन दिले की जीव जीवाणू आपोआप निर्माण होतात व आपले काम कारतात .
सिद्धांत २ - निसर्ग दरवर्षी बदलणार्या हवामानाला व बिघडणार्या पर्यावरणाला जुळवून घेणार्या अनुकूल असे जास्त उतादन देणार्या, कमी पावसात तग धरणार्या, किडी रोगांना प्रतिकार करणार्या पीकांच्या सकस जाती नैसर्गिक निवड पद्धतीने सतत विकसित करत असतो.
या गावरान स्थानिक जाती, पौष्टिक सकस, मधुर, स्वादिष्ट तसेच टिकाऊ अन्न व भाज्या फळे देतात. संकरित जातीत गुणवत्ता नसते. संकरित जाती मानवी आरोग्यास व जमिनीच्या आरोग्यास घातक व शेतकर्यांना परावलंबी व पंगु बनविणार्या असतात. या संकरित जाती शेतकर्यांना गावरान जातीपेक्षा कधीच शुद्ध नफा देत नाहीत.
काटामाऱ्यांनो तुमचे दिवस संपले! उसाच्या वजनातील झोल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
सिद्धांत ३ – पिकांना ओलीत करणे ही पूर्णपणे मानवनिर्मित संकलना आहे. मुळात कोणतेही पीक ओलिताचे नसते. तसे असतं तर ऐन डोंगराच्या माथ्यावर ऐन उन्हाळ्यात हिरवीगार वनराई दिसली नसती. जंगले उभी राहीलीच नसती. बांधावरील फळभारांनी वाकलेली झाडे जगलीच नसती.
सिद्धांत ४ - जीव जीवाला जगवतो व अतिजिवात विलीन होतो. हाच पिकांच्या अन्नचक्राचा व जैविक कीडनियंत्रणाचा मूलमंत्र आहे पिकांची हानी करणार्या किडी रोगाचे नियंत्रण काही नैसर्गिक गोष्टींची निर्मिती करून त्याचप्रमाणे अनेकविध कीटक, मुंग्या, मुंगळे, माशा, बेडूक, खरी, वाळवी, साप व पाखरांच्या साह्याने , तसेच पिकांच्या रोपारोपात त्या त्या किडी आणि रोगाणूच्या विरोधात, अंगभूत प्रतिकारशक्ती निर्माण करून पिकांचे संरक्षण करीत असतात . त्यामुळे पिकांना कोणत्याही मानवी, कृत्रिम पीक संरक्षणाची गरज नाही. निसर्गानेच ती व्यवस्था केलेली आहे.
सिद्धांत ५ - तण देई धन, तणे शत्रू नाहीत, मित्र आहेत. तुलनेत कमी मुदतीची तणे , जास्त मुदतीच्या पिकांना आपले आयुष्य सांल्यानंतर आपले मृत शरीर समर्पण करून कुजन क्रियेने त्यातील बंदिस्त अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी आत्मार्पण यज्ञ करीत असतात. यातून पिकांना पाहिजे असलेली अन्नद्रव्ये पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या प्रमाणात देतात.तणे व आंतरविले तसेच मिश्र पिके आणि फेरपालटातून आपण पुरवू शकतो उंचीने तणे मुख्य पिकांच्यापेक्षा कमी उंच असतील तर ही तणे मुख्य पिकांशी स्पर्धा करीत नाहीत.
सिद्धांत ६ - जमिनीची मशागत आाल्या विविध सजीवरुपी अवजारांनी निसर्ग करीत असतो. जमिनीत सजीव सृष्टी निर्माण करून कार्यप्रवण केली की, जमिनीची मानवी, कृत्रिम मशागत करण्याची आवश्यकता राहत नाही. नैसर्गिक शेतीत कोणत्याही मानवी कृत्रिम मशागतीची गरज पडत नाही. निसर्गाने ती व्यवस्था केली आहे. जमिनीवर सतत जिवंत किंवा मृत आच्छादन केले की जमिनीत हे पर्यावरण तयार होते हे सूक्ष्म पर्यावरण जीवाणूंना व पिकांना जगवतं व वाढवतं.
सिद्धांत ७ - सृष्टी निर्मितीचा कार्यकारणभाव, सृजन करणे हा आहे. सृष्टी निर्मितीचा पहिला मूलगामी उद्देश मानवाचा उत्कर्ष करणे हा आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! सुक्ष्मजीव करतात वनस्पतीच्या अन्नाचे व्यवस्थापन
सिद्धांत ८ - सृष्टीचे शाश्वत नीतिनीयम हे मानवाच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक जडणघडणीस पूरक आहेत. सृष्टीमधील निसर्गाच्या सर्व क्रिया/ प्रक्रिया या मानवाच्या सर्व मूलभूत गरजा पूरविण्यास साहाय्यक, समर्थ व बाध्य आहेत. आता फक्त मानवाचे एकमेव कर्तव्य हे ठरते की त्याने या नैसर्गिक क्रिया-प्रक्रियांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करून बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
सिद्धांत ९ - नैसर्गिक शेतीत कमीत कमी श्रम, कमीत कमी खर्च, कमीत कमी तंत्र, कमीत कमी साधनसामग्री, कमीत कमी मानवशक्ती लागून दरवर्षी उतादनात क्रमाने वाढ घडून येते व ही उत्पादने म्हणजे अन्न, भाज्या, फळे, दूध इत्यादी खाल्याने दीर्घायुषी आरोग्य, मन:शांती, बळ व आनंद मिळतो.
सिद्धांत १० - प्रत्येक सजीवाला विषमुक्त अन्न, प्रदूषणमुक्त, पाणी व पर्यावरण आणि आनंदी, सुखी मिळावे
महत्वाच्या बातम्या;
बारामतीमधील कृषीक कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात, 153 जातीचा भाजीपाला, 52 पिके, 54 नाविन्यपूर्ण स्टार्टअप आणि बरच काही..
सातबारा काढण्याची ऑनलाइन सेवा बंद! शेतकऱ्यांना येत आहेत अनेक अडचणी
Bjp Grass: भाजप गवताने उडवली शेतकऱ्यांची झोप! शेतकऱ्यांना होतोय त्रास
Share your comments