1. बातम्या

बारामतीमधील कृषीक कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात, 153 जातीचा भाजीपाला, 52 पिके, 54 नाविन्यपूर्ण स्टार्टअप आणि बरच काही..

शेतीची पंढरी म्हणून देशात बारामतीची ओळख आहे. याच पंढरीत सर्व शेतकरी ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत ते कृषी प्रदर्शन आता लवकरच सुरु होणार आहे. अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी विज्ञान केंद्र बारामती अटल इंक्यूबेशन सेंटर आयोजित 170 एकर वरील कृषीक-२०२३- कृषी प्रदर्शन येत्या 19 ते 23 जानेवारी रोजी होणार आहे त्या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
krushik baramati

krushik baramati

शेतीची पंढरी म्हणून देशात बारामतीची ओळख आहे. याच पंढरीत सर्व शेतकरी ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत ते कृषी प्रदर्शन आता लवकरच सुरु होणार आहे. अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी विज्ञान केंद्र बारामती अटल इंक्यूबेशन सेंटर आयोजित 170 एकर वरील कृषीक-२०२३- कृषी प्रदर्शन येत्या 19 ते 23 जानेवारी रोजी होणार आहे त्या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

याचा आढावा संस्थेचे चेअरमन राजेंद्रदादा पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी घेतला. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातून लाखो शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात त्यासाठी 170 एकर वरील पीक प्रात्यक्षिक पाहतानाचा शेतकरी फ्लो, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, येणाऱ्या शेतकऱ्यांची भोजन, चहा नाश्ता तसेच लांबून येणा-या शेतकऱ्यांचे निवासबाबत आढावा घेतला.

प्रदर्शनमध्ये प्रत्येक प्लॉटवरती त्या पिकाचे माहितीचे बोर्ड तसेच त्या ठिकाणी माहिती देणारी व्यक्ती असणार आहेत त्याचे नियोजन केले आहे. येथे असलेली 153 जातीच्या भाजीपाल्याची 52 पिके, शेतातील 54 नाविन्यपूर्ण स्टार्टअप, फुल शेतीची 27 पिकांचे 112 वान, स्मार्ट मशीनरीचे 108 प्रकार, १४ प्रकारचे खतांचे डेमो दाखवले जाणार आहेत.

चिंता वाढली! चीनमध्ये धुमाकूळ घातलेला व्हेरिएंट मुंबईत दाखल, पहिल्यांदाच आढळेल 3 रुग्ण

तसेच व्हर्टीकल फार्मिंग, एन एफ टी तंत्रज्ञान, आय ओ टी रोबोट सेंसर आधारित स्मार्ट सिंचन, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञाची ४५ प्रात्यक्षिके, जवस बकव्हींट, हळवी तसेच रब्बी हायब्रीड कांदा, करडईच्या नवीन पिक पद्धती, सफरचंद, एव्हाकोडा, बारमाही फणस आदी ४७ जातींचे व 33 फळ पिकांची रोपे निर्मिती व विक्री, कोरडवाहू जमिनीसाठी अफलातून आंतरपीक पद्धती, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्त भरड धान्याची उत्पादन प्रक्रिया प्रात्यक्षिके इत्यादी अनेक गोष्टी सह २१० कंपन्यांचे स्टॉलस त्या ठिकाणी पाहता येणार आहेत.

काटामाऱ्यांनो तुमचे दिवस संपले! उसाच्या वजनातील झोल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वेळ राखून ठेवावा प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले. हे प्रदर्शन गुरुवार दिनांक 19 जानेवारी रोजी शेतकऱ्यांसाठी खुले केले जाणार आहे याचं दिवशी आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार हे प्रदर्शनास भेट देणार आहेत तसेच सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी शरदचंद्रजी पवार या प्रदर्शनास भेट देणार आहेत. यामधून शेतकऱ्यांना अनेक गोष्टी शिकता येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
सातबारा काढण्याची ऑनलाइन सेवा बंद! शेतकऱ्यांना येत आहेत अनेक अडचणी
Bjp Grass: भाजप गवताने उडवली शेतकऱ्यांची झोप! शेतकऱ्यांना होतोय त्रास
शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! सुक्ष्मजीव‌ करतात वनस्पतीच्या अन्नाचे व्यवस्थापन

English Summary: Preparations for Agricultural Agriculture Expo in Baramati in final stages, Published on: 17 January 2023, 05:54 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters