1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांनो उन्हाळी भेंडी लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या..

भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी - खरीप: जून- जुलै, रब्बी : थंडी सुरु होण्यापूर्वी आणि उन्हाळी : १५ जाने-फेब्रु

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
cultivation technology.

cultivation technology.

उन्हाळी हंगामात घेतले जाणारे भेंडी हे महत्वाचे भाजीपाला पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच भेंडी मध्ये केरोटीन पोटॅशिअम मॅग्नेशिअम फॉलिक ऍसिड असे अनेक पौष्टीक घटक आहेत.त्यामुळे बाजारात भेंडीला वर्षभर मागणी असते.त्यामुळे भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते.

भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त.
लागवडीचा कालावधी -
खरीप: जून- जुलै, रब्बी : थंडी सुरु होण्यापूर्वी आणि
उन्हाळी : १५ जाने-फेब्रु

जमीन:-
भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा.

मध आरोग्यासाठी आहे खूपच भारी, पण त्याची शुद्धता अशा प्रकारे तपास..

जाती :-
अंकुर ४०,पुसा सावनी,महिको १०,परभणी क्रांती,वर्षा, अर्का अनामिका,सिलेक्शन २-२,फुले उत्कर्षा,या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत.
* अंकुर ४० :- सरळ वाढणारी जात.पेरांमधील अंतर कमी फळे हिरवी.व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.
* महिको १० :- अधिक लोकप्रिय जात.फळे गर्द हिरवी.व्हेक्टरी १०-१२ टन उत्पादन.
* वर्षा :- अधिक लोकप्रिय जात.लांबी ५-७ सेमी फळे हिरवी व लुसलूशीत तोडल्यानंतर काळी पडत नाहीत.व्हेक्टरी १० ते १२ टन उत्पादन.

* पुसा सावनी :- आय.ए. आर.आय विकसित जात फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.
* परभणी क्रांती :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित जात. फळे ७-१० सेमी लांब हिरवी पुसा सावनी पेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक,फळे नाजूक तजेलदार हिरवी.पेरणी पासून ५५ दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात १४-१६ तोडे तर खरिपात २० तोडे होतात.व्हेक्टरी ७-८ टन उत्पादन.

मत्स्यशेतीने नशीब पालटले, वर्षाला कमवतोय २ कोटी..

आंतरमशागत :-
२-३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी.मजुरांची टंचाई असल्यास बासालींन तणनाशक २-२.५ लिटर ५००लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे.तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.तणनाशकाचा फावरणीनंतर ७ दिवसांनी पेरणी करावी. फळे येण्याच्या वेळेस रोपांना भर द्यावी.

खत व्यवस्थापन :-
* सेंद्रिय व जिवाणू खते :- शेणखत/कंपोस्ट १५-२० बैलगाडी/एकर
गांडूळ खत ४००-५०० किलो प्रति एकर
निंबोळी पेंड ४ गोणी लागवडीस
जिवाणू खत :-
शेतात टाकणे- रोगप्रक्रिया केली नसल्यास एकरी ३ किलो अँझाटोबॅक्टर व ४ किलो फॉस्फोकल्चर एक बैलगाडी शेणखत मिसळून द्यावे.
* रासायनिक खते :-
पेरणीच्या वेळी ५०-५०-५० किलो व्हेक्टर नत्र स्फुरद व पालाश यांची मात्रा जमिनीत मिसळावी व पेरणी नंतर एक महिन्याच्या कालावधीने नत्राचा दुसरा हफ्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा पेरणी नंतर हलके पाणी द्यावे.त्या नंतर ५ -७ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान, जाणून घ्या...
आदिवासी महिला गायीच्या शेणापासून स्वयंपूर्ण, तयार केला रंग, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक..
जनावरांच्या कृत्रिम गर्भाधानाचे फायदे आणि तोटे

English Summary: Farmers know summer okra cultivation technology.. Published on: 15 February 2023, 11:00 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters