लाल रंगाची भेंडी –काशी लालिमाचे लागवड तंत्रज्ञान

02 April 2021 06:39 AM By: भरत भास्कर जाधव
काशी लालिमा लागवड तंत्रज्ञान

काशी लालिमा लागवड तंत्रज्ञान

आधुनिक जग झपाट्याने बदलत चालले असताना शेतीमध्येही बदल अपेक्षित आहे आणि तो होत असल्याचे आपल्याला पण दिसत आहे. सध्याच्या घडीला आपण ज्या भाजीपाल्याचे सेवन करत आहोत.

त्यामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आहेत आणि त्यामधून आपल्याला जीवनसत्वे, विविध खनिजे, कर्बोदके मिळतात; जी आपल्याला निरोगी राहण्यासाठी महत्वाची असतात. अशीच एक रोजच्या आहारातील सर्वांची आवडती भाजी म्हणजे भेंडी. ह्याच आवडत्या भेंडीने आपला रंग बदलेला आहे.

हिरवी भेंडी तुम्हाला लाल रंगाची भेंडी म्हणून जर बाजारात मिळाली तर तुम्ही आश्चर्यचकित होणार पण ही गोष्ट खरी आहे. भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था, वाराणसी (उत्तर प्रदेश) च्या माध्यमातून नवीन वाणाचे संशोधन केले आहे. ज्यामध्ये भेंडीच्या फळाचा रंग लाल आहे, त्यामागे कारण हे ,कि तुम्ही जी भेंडी खाता त्या भेंडीमधून जर तुम्हाला जास्तीचे पोषक घटक मिळाले  तर तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. या लाल भेंडी मध्ये अॅन्थोसायानीन नावाचे अँटिऑक्सिडंट खाण्यास मिळाते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.

या नवीन भेंडीची जर शेतकऱ्याने लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळू शकतो तसेच शेतकरी या वाणाची परदेशी निर्यात सुद्धा करू शकतो. तर चला या नवीन वाणाच्या लागवडी संदर्भात माहिती घेवूयात...

जमीन व हवामान-

उष्ण व समशीतोष्ण वातावरण पोषक, पोयट्याच्या जमीन उत्तम

वाण-कशी-लालिमा

संशोधन केलेली संस्था:-

भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था, वाराणसी (उत्तर प्रदेश)

संशोधन पूर्ण झालेले वर्ष;- ५ फेब्रुवारी २०१९

फळातील अॅन्थोसायानीनचे प्रमाण:- ३-३.६ मिली ग्रॅम/१०० ग्रॅम वजन (हिरव्या भेंडी फळामध्ये खूप कमी असते)

फळातील मिनरल/खनिज द्रव्ये उपलब्धता प्रमाण:-

लोह: ५१.३ पी.पी.एम, झिंक:-४९.७ पी.पी.एम, कॅल्शियम:-४७६.५ पी.पी.एम

 

लागवड-       

खरीप-जुलैचा पहिला आठवडा (१५ जून ते १५ जुलै)

उन्हाळी:-जानेवारीचा तिसरा आठवडा (१५ जानेवारी ते १५ फुब्रूवारी)

बियाणे प्रमाण- १२-१५ किलो/हेक्टर

बीजप्रक्रिया- पेरणीपुर्वी १-२ ग्रॅम कार्बेन्डेंझीम व २ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + २५ ग्रॅम अझोस्पिरीलम ब्रासिलेन्सी किंवा अॅस्पेरजीलस अवमोरी प्रति किलो बियाण्याला चोळावे.

लागवड अंतर:- ३० × १५ सें.मी.

खतमात्रा- शेणखत  २० टन प्रती हेक्टर पूर्वमशागत करताना, रासायनिक खताची मात्रा १०० किलो नत्र, ५० किलो स्पुरद व ५० किलो प्रती हेक्टर दयावी.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन:-

  • सेंद्रिय खते:- २० टन शेणखत प्रती हेक्टर

  • जीवाणू खाते:- अॅझोटोबॅक्टर व स्पुरद विरघळणारे जीवाणू २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे.

  • खते देण्याची वेळ:-१) सेंद्रिय खते पेरणीपूर्वी: १५ दिवस अगोदर द्यावीत.

  • रासायनिक खाते: १०:५०:५० नत्र:स्पुरद:पालाश किलो प्रती हेक्टर. अर्धे नत्र: संपूर्ण स्पुरद: पालाश पेरणीच्या वेळी ध्यावे व उर्वरित ५० किलो नत्र तीन समान हफ्त्यामध्ये विभागून ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे.

  • जीवाणू खाते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

  • माती परीक्षणानुसार सुक्ष अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीत फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो प्रती हेक्टर + बोरॅक्स ५ किलो प्रती हेक्टर पेरणीच्या वेळी जमिनीतून किंवा फेरस सल्फेट + झिंक सल्फेट ०.५ % बोरिक अॅसीड ०.२ % पेरणी नंतर ३० ते ४५ दिवसांनी फवारावे.

संजीवकांचा वापर:
१. जिबरेलिक ऍसिड १० पी. पी. एम. फवारल्यास हिरव्यागार व लुसलुशीत भेंडी मिळतात.

२. फळ तोडणीच्या एक दिवस अगोदर एन. ए. ए. २० पी. पी. एम. व अल्ट्राझाईम १०० पी. पी. एम. फवारल्यास दूरच्या बाजारपेठेत पाठविताना भेंडी लुसलुशीत राहते.

आंतरमशागत-

२-३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी. मजुरांची टंचाई असल्यास बासालींन तणनाशक २-२.५ लिटर ५००लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे.तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.तणनाशकाचा फावरणीनंतर ७  दिवसांनी पेरणी करावी. फळे येण्याच्या वेळेस रोपांना भर द्यावी. सरीमध्ये गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे किंवा पालापाचोळ्याचे किंवा रंगीत प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहतो व तणाचा त्रास कमी होतो.

पाणी व्यवस्थापन- खरिफ हंगामामध्ये लागवड असल्या कारणाने पाण्याची गरज भासत नाही, जर पुसणे टन दिलाच तर दोन पाण्याच्या पाळ्या बसायला हव्यात.

 

काढणी-

पेरणी नंतर ३५-४५ दिवसात फुले येतात व त्यानंतर ५-६ दिवसात फळे तोडणी योग्य होतात. कोवळ्या फळाची काढणी तोडा सुरु झाल्यास २-३ दिवसाच्या अंतराने करावी.तोडणीसाठी म. फु.कृ. विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा.निर्यातीसाठी ५-७ सेमी लांब कोवळी एकसारखी फळाची तोडणी करावी. काढणी सकाळी लवकर करावी. काढणी नंतर शून्य ऊर्जा शीत कक्षा मध्ये भेंडीचे पूर्व शीतकरण करावे.

उत्पन्न:- १५-२० टन प्रती हेक्टर.

लेखक

प्रदिप बाळासो भापकर

एम.एस्सी (उध्यानविध्या)

वरिष्ठ संशोधन छात्र,

कृषी विज्ञान केंद्र, बारामती

मो.नं:-९०२१७३०४७४

lady's finger lady's finger Cultivation lady's finger Cultivation Technology लाल रंगाची भेंडी काशी लालिमा लागवड तंत्रज्ञान
English Summary: Red lady's finger Cultivation Technology

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.