कृषी विभागाच्या मते सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी. ज्या बियाण्यांची उगवण क्षमता ही उत्तम असेल अशाच बियाण्याची पेरणी शेतकऱ्यांनी करावी जेणेकरून सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येईल. सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणांचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादीत होणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.
उगवण क्षमता तपासणी करण्याकरिता गोणपाट किंवा वर्तमानपत्राचा कागद वापरावा. एका ओळीमध्ये १.५ ते २ सें.मी. अंतरावर १० दाणे ठेवावेत. अशा प्रकारे १० ओळींमध्ये एकूण १०० दाणे व्यवस्थित रांगेत ठेवावे. त्यानंतर गोणपाटावर अथवा वर्तमानपत्रावर पाणी टाकून ओले करावेत.
आता यशवंत कारखान्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, आश्वासन करणार पूर्ण...
ते गोल गुंडाळून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. अधूनमधून त्यावर पाणी शिंपडत राहावे. सहा ते सात दिवसांनंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. जर उगवण झालेल्या बियाण्यांची सरासरी संख्या सत्तर किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे.
पिकांची मशागत सोडा, आता गांडुळाच्या शेतीतून लाखो रुपये कमवा, जाणून घ्या कसे..
शिफारशीप्रमाणे ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येईल. उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या सत्तरपेक्षा कमी असेल, तर एकरी बियाण्याचे प्रमाण त्यानुसार वाढवून पेरणी करावी. मात्र, साठ टक्क्यांपेक्षा कमी उगवणशक्ती असणारे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरू नये.
सर्वात महाग आंब्याची शेती करून दोन भावांनी कमवले लाखो रुपये, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांची कृषी जागरणाला भेट, म्हणाले, निसर्ग कधीही विश्वासघात करत नाही
आता स्वयंपाकघरातून पिवळी मसूर गायब होणार, किमती झपाट्याने वाढल्या
Share your comments