1. कृषीपीडिया

करप्या रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकरी वर्ग संकटात

किरण भेकणे
किरण भेकणे
crop damage

crop damage

मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीतील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच खरीप हंगामातील पिकात सुद्धा घट होणार आहे. सध्या पावसाचे  सावट  कुठे दूर झाले आहे तो पर्यंत खरीप हंगामातील पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे.लातूर जिल्ह्यातील रेणापूर परिसरात करप्या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर वाढतच चालला असल्याने तेथील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंदी दिली आहे:

खरीप हंगामाच्या सुरुवातीला खरीपातील पीक जोपासताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मागील वर्षी खरीप हंगामातील पिकांचे खुप नुकसान झाले होते तरी सुद्धा यावेळी शेतकऱ्यानी सोयाबीन पिकावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे.लातूरच्या बाजारपेठेत आणि नगदी पिकात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंदी दिली आहे. मागील काही दिवसात पाऊसाने मोठा धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाले मात्र आत्ता ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला आहे.

हेही वाचा:शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीय का? गव्हाच्या MACS 6478 ह्या जातीबिंषयी नाही तर मग तुम्ही हे जाणुन घ्या

दिवसेंदिवस हवामानात आर्द्रता वाढतच चाललेली आहे त्यामुळे बुरशीजन्य वातावरण सुरू आहे आणि यामुळे सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत आहेत  आणि  त्यामुळे  अत्ता  सोयाबीनचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झालेला आहे. प्रत्येक वर्षी रेणापूर परिसरात सोयाबीन चे पीक घेतले जाते जे की पिकांची फेरपालट करणे आवश्यकता असते  मात्र उत्पादन  जास्त  निघावे म्हणून तेथील शेतकरी सोयाबीन पीक घेतात.खरीप हंगामाच्या सुरुवातीस पावसाने धुमाकूळ घातला त्यानंतर किडीचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फवारणी  चालू  केली. अत्ता  सोयाबीन भरत असताना पाऊसाने पुन्हा धुमाकूळ घातला आणि नंतर उघडला तो पर्यंत अत्ता किडीचा पुन्हा प्रादुर्भाव दिसू लागला त्यामुळे शेतकरी वर्ग खूप संकटात आहे.

पिक पध्दतीत बदल गरजेचा:

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने जे पीक घेतले जाते ते म्हणजे सोयाबीन चे पीक. प्रत्येक वर्षी रब्बी पिकाच्या सरासरीत घट होत असते मात्र सोयाबीन पिकात वाढ होत असते त्यामुळे शेतकरी सोयाबीन चे पीक घेत असतो. शेतकर्यांनी पिकाची फेरपालट करणे आवश्यक आहे.

कृषी अधिकारी थेट बांधावर:

सध्या पाऊस उघडला असल्याने पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहेत. कालच्या शुक्रवारी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रमिला जंजिरे, अंगद सुडे रेणापूर परिसरात गेले आहेत. पाहणी करतेवेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले.

असे करा पिकाचे व्यवस्थापन:

पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सल्फर आणि टेब्युकोन्याझोल 20 ग्रम प्रती 10 लीटर पाण्यात मिसळावे आणि त्याची फवारणी करावी.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters