1. कृषीपीडिया

Crop Production: 'या' पाच पिकांच्या शेतीमधून शेतकरी कमवतोय लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पिकांविषयी...

शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या आपण पाहिले तर बदलत्या काळात तसेच आधुनिकीकरण झाले असताना देखील शेतकरी बांधव आजही पारंपरिक पिकांची लागवड करून लाखोंचे उत्पन्न (Farmer Income) घेत आहेत.

Farmers earning lakhs rupees

Farmers earning lakhs rupees

शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या आपण पाहिले तर बदलत्या काळात तसेच आधुनिकीकरण झाले असताना देखील शेतकरी बांधव आजही पारंपरिक पिकांची लागवड करून लाखोंचे उत्पन्न (Farmer Income) कमवत आहेत.

भारतात उत्पादित केल्या जाणार्‍या काही पारंपरिक तसेच नगदी पिकांच्या शेती विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे शेतकरी मुख्यत्वे कोणत्या पिकांना प्राधान्य देत आहेत या पिकांबद्दलही आपण माहिती घेणार आहोत.

हे ही वाचा 
भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना घरबसल्या भरता येणार शेतीसंबंधीचे कर

1) गहू लागवड: गहू लागवड (Wheat Farming) ही रब्बी हंगामात केली जाते. गहू हे रब्बी हंगामातील मुख्य नगदी पीक आहे. भारतामध्ये गव्हाचा सर्वात जात वापर केला जातो. रोटीपासून मिठाई उत्पादनांपर्यंत सर्व काही गव्हापासून बनवले जाते.

भारताला गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश देखील म्हटले जाते, शेतकरी गव्हाच्या लागवडीतून चांगले उत्पन्न कमवू शकतो. महाराष्ट्रात गव्हाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. 

2) भातशेती: आपला देश तांदूळचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून दुसऱ्या स्थानावर आहे. जगातील एक तृतीयांश भात लागवड (Rice Farming) एकट्या भारतात होते. हे खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक आहे, ज्याची भारतातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

3) मका लागवड: भारतात मक्याची लागवड (Maize Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. चारा आणि धान्य दोन्हीसाठी शेतकऱ्यांना फायदा होतो. विशेष म्हणजे तांदूळ आणि गहू नंतर सर्वात जास्त वापरले जाणारे मका लागवड पीक आहे.

भारत हा मक्याचा सातवा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी मक्याची लागवड करू शकतात, शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पादन मिळू शकते.

हे ही वाचा 
Pest Management: शेतकरी मित्रांनो आता पिकांचे नुकसान टळणार; किडीचे करा असे व्यवस्थापन

4) ताग लागवड: भारतातील प्रमुख नगदी पिकांमध्ये, तागाचे नावही सर्वोच्च पिकांमध्ये घेतले जाते, ज्यापासून बर्लॅप, चटई, रस्सी, सूत, कार्पेट, हेसियन किंवा टायर कापड तयार केले जातात आणि निर्यात केले जातात. ताग लागवडीतूनही (Jute Farming) शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात.

5) कडधान्य लागवड: भारतात डाळींच्या लागवडीबरोबरच (Pulses Farming) त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. काही काळापूर्वीपर्यंत बहुतांश डाळी आयात केल्या जात होत्या, मात्र आता भारतातील शेतकऱ्यांना डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत.कडधान्य लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या 
Ration Card Holders: रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का; मोफत धान्य सुविधा बंद होणार
Farmers Fund: शेतकऱ्यांचे अच्छे दिन! खात्यात जमा होणार 50 हजारांचा निधी
Organic Foods: 'हा' व्यवसाय घरबसल्या सुरू करा; दरमहा मिळतील 50 हजार रुपये

English Summary: Farmers earning lakhs rupees farming five crops Published on: 02 August 2022, 11:28 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters