झुम शेतीचा प्रकार खूप कमी लोकांना माहिती आहे. आतापर्यंत आपण कोरडवाहू शेती, बागायती शेती, सेंद्रिय शेती, अत्याधुनिक शेती असे शेतीचे प्रकार पाहिले आहेत. मात्र झुम शेती म्हणजे काय? हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आज याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
झुम प्रकार खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे. आतापर्यंत आपल्याला शेतीचे जे प्रकार माहित आहेत त्यात शेतातील पिके बदलली जातात. मात्र झुम शेतीच्या पद्धतीत चक्क शेतजमीनच बदलली जाते. आजही भारतात असे अनेक भाग आहेत जिथे शेतकरी अजूनही झूम शेती करतात.
झूम शेती हा जुन्या शेतीचा एक प्रकार आहे. चांगले उत्पादन मिळते. शेतीची ही पद्धत मानवाने आदिम असताना अवलंबली होती. यामध्ये, सुपीक जमीन बनवण्यासाठी जंगलातील लहान क्षेत्र काढून टाकून किंवा जाळून, वन जाळून जमिनीत पोटॅश मिसळले जाते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता आणि पोषक द्रव्ये वाढते.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमाल! गटशेतीतून घेतले तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन
यानंतर जमिनीची सुपीकता राहेपर्यंत या मोकळ्या जागेवर लागवड केली जाते, सुपीकता संपल्यानंतर जागा बदलली जाते. या पद्धतीत जंगलातील झाडे तोडून शेततळे आणि बेड तयार केले जातात आणि मोकळी झालेली जमीन हाताने वापरल्या जाणार्या अवजारांनी नांगरली जाते. ही जमीन २-३ वर्षांनी सोडली जाते जेव्हा जमिनीची सुपीकता कमी होते.
केशरचे पाणी आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही ठरतेय अद्भूत; वाचा सविस्तर
भारतात 'या' ठिकाणी झुम शेती केली जाते
1) झूम शेतीबाबत नेहमीच वाद-विवाद होत आले आहेत. पण तरीही देशाच्या कानाकोपर्यात आजही झुमची लागवड केली जाते. ओरिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि केरळच्या काही भागांसारख्या ईशान्य भारतातील काही भागांमध्ये देखील कमी प्रमाणात होते.
2) यासह हे मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि छत्तीसगडच्या बस्तरच्या अबुझमद प्रदेशात केले जाते. येथील आदिवासी गटांमध्ये अजूनही झुमची शेती प्रचलित आहे.
3) शेतीची ही पद्धत बहुतांशी आदिवासी लोक करीत असतात. आदिवासी समाजातील लोक जंगले कापून शेती करतात आणि काही वर्षांनी ती जागा सोडतात आणि तिथून दुसर्या ठिकाणी जातात, त्यानंतर तिथे हीच प्रक्रिया पुन्हा करतात.
4) झुम शेती संपुष्टात येण्याचे कारण म्हणजे झूम शेतीमुळे जंगलातील मौल्यवान नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होत असल्याने शेतीच्या या पद्धतीला परावृत्त करून आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यात आले. आता हळूहळू ही शेतीची पद्धत संपुष्टात येऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
गांजाची नशा किती वेळ राहते? संशोधनात महत्वाची माहिती आली समोर, जाणून घ्या
सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा फटका; ज्वारी, बाजरी, तांदळाच्या दरात वाढ
१८ ते २६ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा; उजळणार भाग्य
Share your comments