1. बातम्या

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा फटका; ज्वारी, बाजरी, तांदळाच्या दरात वाढ

सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या (jowar bajri rice) दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

पाऊस, इंधनांचे वाढते दर आणि साठेबाजीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या (jowar bajri rice) दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी वाशीतील घाऊक बाजारात ज्वारीचा दर 21 ते 39 रुपये किलो होता.

सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 62 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात वाढ

मागील वर्षी बाजरीला 18 ते 25 रुपये किलो दर मिळत होता. सध्या बाजरीचे दर देखील वाढले आहेत. आता बाजरीला 24 ते 35 रुपये दर मिळत आहे.

गेल्यावर्षी तांदळाला 30 ते 42 रुपये किलो दर मिळत होता. तो सध्या 29 ते 46 रुपये किलोवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात अनुक्रमे 7 रु, 6 रु आणि 4 रुपयांनी वाढ झाली आहे.

परभणीसह 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका; ८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

धान्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट (budget) कोलमडले आहे. प्रामुख्याने सोलापूरमध्ये तर काही प्रमाणात लातूर, विदर्भामध्ये ज्वारी- बाजरी घेतली जाते. तांदळाच्या किमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे.

तांदळाचे उत्पादन हे बिहार, हरियाना, यूपी, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात होते. मात्र डिझलेचे भाव वाढल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे.

महत्वाच्या बातम्या 
१८ ते २६ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा; उजळणार भाग्य
केशरचे पाणी आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही ठरतेय अद्भूत; वाचा सविस्तर
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमाल! गटशेतीतून घेतले तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन

English Summary: Inflation common man during festive season Increase prices jowar bajri rice Published on: 16 October 2022, 09:56 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters