1. कृषीपीडिया

शेतकरी आणि नैसर्गिक संकटे

कृषी क्षेत्रात असं वाटतं की या क्षेत्रामधल्या अनुभवातून आज च्या परिस्थितीत आपण समजून घ्यायला हवं की शेती मध्ये संकट हे येणं हे काही नवं नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकरी आणि नैसर्गिक संकटे

शेतकरी आणि नैसर्गिक संकटे

कृषी क्षेत्रात असं वाटतं की या क्षेत्रामधल्या अनुभवातून आज च्या परिस्थितीत आपण समजून घ्यायला हवं की शेती मध्ये संकट हे येणं हे काही नवं नाही.जे संकट आहे हीआपली परीक्षाघेण्यासाठी येत असतात. तो आपल्या जिवनाचा एक भागच आहेत आणि अशा संकटांना सुध्दा आपला शेतकरी वर्ग पुरुन उरत आहे.दरवर्षी नवनवीन संकटाला सुद्धा तोंड देण्यासाठी सज्ज आहे. मला या क्षेत्रात वैयक्तिक तरी काही शंका वाटत नाही. आपण आपलं उत्पादन घेण्यासाठी संकटाला जिद्दीचे आणि कणखर मानसिकतेची आपण खूपवेळा परीक्षा दिली आहे. खूप वेळा आपण सर्व नैसर्गिक संकटे असेल किंवा इतर असेल आपल्या शेतकऱी वर्गाने दाखवून दिले आहे की आपन कधीच निराश होवून हार मानू शकत नाही. 

या सर्व भुमिका बजावत एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी जी काही आव्हानं आपल्या समोर येताहेत, ती मुख्यत्वे नैसर्गिक आपत्तीचीच आव्हानं येतात. त्यांना पुरुन उरायचं असेल. तर शास्त्रीय पद्धतीनेच त्याला तोंड द्यावे लागणार आहे. पावसाच्या ज्या काही घटना आपण पाहिल्यात, त्या थेट वातावरण परिणाम दाखवणाऱ्या आहेत. सगळं जगभर असं घडतंय. कुठंतरी धो धो पाऊस पडणं. कमी कालावधीत जास्त पाऊस पडणं. कुठंतरी कोरडा दुष्काळ येणं. या अशा सगळ्या घटना यापुढील काळातही घडत राहणार आहेत. त्यामुळं या समस्येला तोंड देण्यासाठी आपल्याला शास्त्राचाच पर्याय उपलब्ध आहे. शास्त्रीय पध्दतीने याकडे पाहणे. 

हे सगळं नीट समजून घेणे. हाच यातून पुढे जाण्याचा मार्ग हा शेतकरी काढत असतो. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता नवनवीन बि बियाणेआपण लावत आहोत. या बदलत्या वातावरणाला तोंड देण्यासाठी कोठेतरी कमजोर कमी पडतांना दिसत आहे. या अशा बदलत्या वातावरणात त्याचा टिकाव लागणे कठीण होतं चाललं आहे हे असे एकप्रकारे शेती अनुभवातून सिध्द झालेले आहे. आपल्याला या वातावरणात सुट होणारें बि बियाणे पाहिजे आहेत की ज्या अशा प्रतिकूल वातावरणातलाही सक्षमपणे तोंड देऊ शकतील.पावसाळा भरपूर पडला तर त्या काळात तग धरू शकले पाहिजेत व चांगल्या पद्धतीने पिकं उत्पादन झाले पाहिजे. या गोष्टी चा खरोखर विचार करावा लागणार आहे.

सर्वात जास्त अडचणीत आज शेतकरी आहेत. कारण सर्वात जास्त पिकाच नुकसान कोणत्याही हंगामात ठेवलेच आहे. आपल्याला या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतो त्या साठी तयारी म्हणजे स्वत: मनाने कणखर असणं आणि आपली कणखर वृत्ती बाकीच्यांना दाखवून देणं. हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तो हार मानत नाही. कोणत्याही परिस्थितीला पुरुन उरतोय तो म्हणजे बळीराजा.आतापर्यंत निसर्गाचे सोसलेले वार व आपण त्या गोष्टी वर केलेली मात त्या साठी त्याच मार्गाने आपल्याला पुढं जावं लागणार आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे.

 

Mission agriculture soil information

milindgode111@gmail.com

Milind j gode

9423361185

English Summary: Farmer's and natural problems agriculture Published on: 28 March 2022, 11:32 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters