शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगली कमाई घेत असतात. अशाच एका नवीन प्रयोगाविषयी (Experiment) आज आपण माहिती घेणार आहोत. वाशिंबे येथील राजाभाऊ पाटील यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
राजाभाऊ पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये रेड बनाना ची शेती करून दाखविली आहे. यांची एकूण ३० एकर शेती आहे. सात-आठ वर्षांपूर्वी केळीच्या विपणना निमित्ताने ते तमिळनाडूमध्ये गेले असताना तिकडच्या रेड बनाना, वेलची वाणांची माहिती घेतली. त्याची लागवड, बाजारपेठ यांचा अभ्यास करून पिकविली. खाण्यासाठी गोड असून त्यांच्यात औषधी गुणधर्म आहेत.
रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचय शक्ती वाढण्यास ही केळी उपयुक्त आहेत. 'क' जीवनसत्त्व, अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण चांगले आहे. विविध आजारांवर ती फायदेशीर ठरत असून, त्यास चांगली मागणी आहेत. त्यामुळे त्यास नेहमीच्या केळीपेक्षा अधिक दर मिळतो याविषयी त्यांना माहिती मिळाली. यानंतर त्यांनी धाडस व जोखीम घेऊन या वाणांची लागवड (cultivation) करण्याचे ठरविले.
शेतकऱ्यांनो शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करून मिळवा लाखों रुपयांचा नफा
नव्या वाणांचे प्रयोग
पुणे भागातील एका कंपनीकडून वेलची व रेड बनाना (banana) वाणांची रोपे आणली. त्या वेळी ही रोपे आम्ही फक्त दक्षिण भारतात पुरवतो. आपल्या वातावरणात ती चांगल्या प्रकारे वाढतील की नाही याची खात्री नाही. स्वतःच्या जबाबदारीवर त्यांचा प्रयोग करावा असे कंपनीकडून सांगण्यात आले.
यानुसार त्यांच्याकडून 'बॉण्ड'वर लिहूनही घेण्यात आले. आज वेलची वाणाच्या लागवडीला सात वर्षे, तर 'रेड बनाना' वाणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही वाण चांगला 'परफॉर्मन्स' (performance) दाखवत असल्याचे ते सांगतात. वेलची वाण १६ एकरांवर, तर रेड बनाना वाण चार एकरांवर आहे. दोन्ही केळी खाण्यास अत्यंत गोड आहेत.
'या' दोन राशीच्या लोकांना मिळणार करियरमध्ये संधी, पैसाही मिळणार चांगला
पाच पट दर
२०२० मध्ये वेलची केळीला प्रति किलो किमान ३० रुपये, सर्वाधिक ५८ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये २०२१ मध्ये रेड बनानाला किमान ३० रुपये, सर्वाधिक ५५ रुपये, तर वेलचीला किमान ४५ रुपये, सर्वाधिक ६० रुपये व यंदा गेल्या महिन्यात रेड बनानाला (red banana) किमान ५० रुपये, सर्वाधिक ६५ रुपये, तर वेलचीला किमान ५५ रुपये आणि सर्वाधिक ७५ रुपये दर मिळाला. नेहमीच्या केळीच्या तुलनेत हे दर किमान पाचपटांपर्यंतअधिक आहेत.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो चांगल्या उत्पादनासाठी 'या' खताचा करा वापर; होणार लाखोंमध्ये कमाई
सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर; आजही विकला जातोय 'या' दराने
सरकारच्या 'या' योजनेत फक्त 240 रुपये गुंतवा; मिळणार 50 लाखांचा नफा
केंद्र सरकारने सादर केला अहवाल; नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ
Share your comments