हे जैविक कीटकनाशक स्वता जैविक शेती मित्रगनीभाई सय्यद यांनी बनवल आहे. हे जैविक कीटकनाशक काळा मावा पिवळा मावा हिरवा मावा थिप्स तुडतुडे पांढरी माशी रस शोषन करनार्या सर्व कीडी मिरची वरील बोकड्या व्हायरस टोमॅटो वरील लीफ व्हायरस भेंडी वांग्यावरील शेंडे अळी मक्यावरील लष्करअळी हरभर्यावरील व तुरी वरील घाटे अळी फळ पोखरनारी अळी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीया सर्व कीडींचा विनाश होतो पिकावरील समस्या दुर होतील शेतकर्याच नुसकानीपासुन बचाव होईल.
कीटक नियंत्रणहोन्यास मदत होईल, वापरण्याची पध्दत :- पाच लीटर देशी गाईचे ताजे ताक घेऊन त्यामधे एक कीलो हिंगणास्त्र कमीत कमी पाच तास भिजत ठेवा नंतर हे द्रावण दोनशे लीटर पाण्यात टाका गाळुन घेऊन फवारणी करा एकरी प्रमाण:- सर्व पिकांनसाठी एकरी एक कीलो हिंगणास्त्र लागते. थिप्स पानातील रस शोषुन घेतात पानावर काळे डाग पडतात त्यावर विषाणुंची वाढ होऊन ते विषाणु कळीवर पांगतात कळी जसजशी मोठी होईल तसतशे डाग पांगत जातात होच तो तेल्या.
थिप्स नायनाट करण्यासाठी हिंगणास्त्राची फवारणी खुपच फायद्याची ठरनार आहे . तिसरी गोष्ट कांद्या घ्या हवामान बदलल किंवा धुई पडली किंवा रीमझीम पाऊस झाला की कांद्याचे शेंडे जळणे वाढ खुंटणे किंवा पिळ पडणे असे प्रकार चालु होतात अशावेळी हिंगणास्त्राची फवारणी चांगल काम करते. कांद्याच्या पातीमधे थिप्स असतात त्याला आपण आकडी मावा म्हणतो त्यावर सुद्धा हिंगणास्त्र खुपच छान काम करते. टोमँटो वर व्हायरस येतो नंतर त्याच डाऊनीमधे रुपांतर होत अशा वेळी हिंगणास्त्राची फवारणी निर्णायक ठरते.
आपण मिरची लावतो त्यावर प्रथम आवस्थेत बोकड्या व्हायरस नेहमीच दिसतो वाढ खुंटते त्यावळी हिंगणास्त्र फवारा नवीन फुटवे येतील बोकड्या नामशेष होईल. हिंगणास्त्रामधे चार तत्वे आहेत यामधे बुरशीनाशक,व्हायरस प्रतीबंधक,किटकनाशक,पिकांच्या वाढीसाठी ग्रोथ प्रोमोटर या चारही गोष्टी हिंगणास्त्रात आहेत बाहेरुन काहीही आणायची गरज पडणार नाही एकदा उपयोग करुन पहा शंभर %रीझल्ट मिळतील
Share your comments