1. कृषीपीडिया

शेतकरी बंधुनो कृषि विद्यापीठाच्या सल्ल्याने फायद्याची व्यावसायिक शेती कृतीत आणा :- आ. श्री. हरीश पिंपळे

विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा!

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकरी बंधुनो कृषि विद्यापीठाच्या सल्ल्याने फायद्याची व्यावसायिक शेती कृतीत आणा :- आ. श्री. हरीश पिंपळे

शेतकरी बंधुनो कृषि विद्यापीठाच्या सल्ल्याने फायद्याची व्यावसायिक शेती कृतीत आणा :- आ. श्री. हरीश पिंपळे

विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा!तिवसा ग्रामवासियांना केले मार्गदर्शन शेती हाच बहुतांश ग्रामीण भागाचा मुख्य व्यवसाय असल्याने आता बदलत्या परिस्थितीत हवामानाकुल फायदेशीर व्यावसायिक शेतीचे तंत्रज्ञान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे हे जाणून शेतकरी बांधवांनी विद्यापीठाची कास धरावी व फायदेशीर व्यावसायिक शेतीचे तंत्रज्ञान कृतीत आणावे असा वास्तविक सल्ला आमदार हरीश पिंपळे

यांनी शेतकरी बांधवांना दिला. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ दत्तक ग्राम तिवसा येथे विद्यापीठ शास्त्रज्ञांचे भेटी प्रसंगी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते.

भाजीपाल्यावरील किडींच्या प्रादुर्भावाकडे आताच लक्ष द्या

कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्या अथक व निरंतर परिश्रमातून कालसुसंगत तंत्रज्ञान विकसित करीत असून आपल्यासाठीच निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करणे ही आपली जबाबदारी समजत शेतकरी बांधवांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करावे Farmers should understand their responsibility and adopt modern farming technology असे सांगतानाच विद्यापीठ शास्त्रज्ञ सुट्टीच्या दिवशी

सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यंदा राज्यात झालेल्या पावसाने काही ठिकाणी पीक परिस्थिती चांगली तर बरेच ठिकाणी शेतकरी बांधव विविध समस्यांचा सामना करतांना दिसत आहेत. कापूस, तूर, सोयाबीन या महत्वाच्या पिकांसह इतर पिकांच्या विविध अवस्था सध्या असून अति पावसाने व सूर्य प्रकाशाचे आभावाने पीक पिवळे पडणे, कीड -रोगांचा वाढता प्रभाव, तणांचा प्रसार आदीवर शेतकरी बांधवांच्या समस्या वर डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाद्वारे विविध माध्यमाचा

प्रभावी वापर करीत समाधानकारक मार्गदर्शन करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या " माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी " या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत विद्यापीठ शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी संपूर्ण विदर्भ स्तरावर पीक परिस्थितीवर मार्गदर्शन करीत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे नेतृत्वात विस्तार शिक्षण

संचालनालयाची संपूर्ण चमूने शनिवारी दत्तक ग्राम तिवसा येथे भेट देत शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून त्यांचे समाधान केले व शेतकरी बांधवांच्या शेतावर शिवार फेरी करत पीक परिस्थिती जाणून घेत शंका समाधान केले. या भेटीचे प्रसंगी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे, मुख्य संपादक डॉ. संजीवकुमार सलामे, लेखाधिकारी श्री. दीपक येलकर यांचे सह सरपंच श्री. गजानन लुले, ग्राम पंचायत सदस्य व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. आमदार हरीश पिंपळे यांचे विशेष उपस्थितीने सदर शिवार फेरी कृषी विद्यापीठ अधिकारी वर्गांचा सुद्धा उत्साह वाढवून गेली.

English Summary: Farmer brothers, with the advice of the University of Agriculture, bring profitable commercial agriculture into action:- A. Mr. Harish Pimple Published on: 27 September 2022, 07:46 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters