सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. याचे उदाहरण म्हणजे सध्या मोदी सरकार शेतकऱ्यांचे शेणापासून उत्पन्न वाढविण्याचे काम करत आहे. यासाठी मोदी सरकारने (modi government) मोठी योजना आखली आहे. याचा शेतकऱ्यांना (farmers) चांगला फायदा होणार आहे.
आपण पाहिले तर देशात ३०० दशलक्षाहून अधिक गुरे आहेत. शेणापासून बनवलेले बायोगॅस घरगुती गॅसच्या (Biogas is domestic gas) ५०% गरज भगवते. भारत सरकारने एक कंपनी सुरू केली आहे जी शेणापासून बायोगॅस, कंपोस्ट आणि इतर उत्पादने बनवते. यातून शेतकऱ्यांना फायदा होईल.
केंद्र सरकारने राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड मालकीची उपकंपनी, एनडीडीबी मृदा लिमिटेडची (NDDB SOIL LIMITED) स्थापना केली आहे. ही नवीन कंपनी एनडीडीबी मृदा लिमिटेड मळी/शेणाच्या विक्रीतून दुग्ध उत्पादक शेतकर्यांना उत्पन्नाचे मार्ग खुले करेल.
Agricultural Business: शेतकऱ्यांनो 'हे' 3 व्यवसाय शेतीमधून करा; कमी खर्चात मिळेल लाखोंचा नफा
स्वयंपाकाच्या इंधनाचे बायोगॅसमध्ये (Biogas fuel) रूपांतर केल्यास शेतकर्यांची मोठी बचत होईल. गायींच्या शेणाचा अधिक चांगला वापर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही नवीन कंपनी कंपोस्ट व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देईल.
मत्स्यपालकांनो आता ऑनलाइन ताजे मासे खरेदी विक्री करा; सरकारने केले 'एक्वा बाजार' अँप लाँच\
एनडीडीबी मृदा लिमिटेड
एनडीडीबी मृदा लिमिटेड कंपनी (NDDB SOIL LIMITED) खत व्यवस्थापन मूल्य शृंखला तयार करून शेणाच्या कार्यक्षम वापरावर लक्ष केंद्रित करेल, ज्यातून दुग्ध उत्पादक शेतकर्यांचा फायदा होईल.
यासोबतच ते स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देईल. कंपनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करून काम करेल. यापैकी प्रत्येक दुग्ध उत्पादक शेतकर्याच्या घरात बायोगॅस संयंत्र उभारण्याचे देखील करेल.
महत्वाच्या बातम्या
Vegetable Crop: शेतकऱ्यांनो चांगल्या नफ्यासाठी मंडप आणि 3G पद्धतीने भाजीपाला पिकवा; व्हाल मालामाल
Heavy Rain: 'या' ठिकाणी धो-धो बरसणार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
'या' राशीच्या लोकांना कामात मिळणार भरभरून यश; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Share your comments