या वर्षी कपाशी पिकामध्ये दहिया किंवा पानांवरील पांढरे तांबडे डाग या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसून आला आहे. हा रोग रॅम्युलॅरिया एरिओलाय (रॅम्युलॅरिया गॉसीपाय ) या बुरशीमुळे होतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व परिसरातील प्रक्षेत्रात तसेच
मानोरा, कारंजालाड, शेलू, मानोरा, बार्शीटाकळी, मंगरुळपीर, महान, दर्यापूर, म्हैसांग, दहीहांडा, अकोट या परिसरात दिनाक २ व ३ नोव्हेंबर रोजी
मागील दहा वर्षात जैविक तंत्रज्ञानावर बरेच संशोधन झाले. त्याबद्दल माहीती सोप्या भाषेत
विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाच्या चमूने भेट दिली असता कपाशी रोगाचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून आला.When a team of university scientists visited, the prevalence of cotton disease was observed everywhere. हा रोग अमेरिकन कपाशीवरही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
रोगाची कारणे व रोगवाढीस अनुकूल घटक हवामानातील जास्त आर्द्रता आणि थंड तापमान रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरले. लागवडीतील अंतर कमी असलेल्या पिकामध्ये रोगाचा प्रसार जलद झाला. ओलिताखालील कपाशीमध्ये रोगाचे प्रमाण अधिक दिसून आले.
या रोगांची बीजे जमिनीत पडलेल्या रोगट अवशेषामध्ये सुप्तावस्थेत राहतात. एकात्मिक व्यवस्थापन१. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.२. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा तसेच पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असताना फवारणी द्वारे नत्र खते देऊ नये.
3. रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास अझोक्सीस्ट्रोबिन १८.२% w/ w + 1 डायफेनोकोनाझोल १९.४% w/ w एस. सी.१ ग्रॅम किंवा क्रेसोझीम मिथाइल ४४.३ % एस. सी.१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
Share your comments