अधिक नफा मिळवण्यासाठी शेतकरी शेतीबरोबर इतर व्यवसायाच्या शोधात असतो. मात्र नेमका कोणता व्यवसाय करावा हे याचे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
आपण आज एका अश्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला ५० हजारांची गुंतवणूक करून लाखोंचा नफा मिळणार आहे. इतकेच काय तर या व्यवसायासाठी सरकार ४० % अनुदान देखील देते. चला तर मग जाणून घेऊयात मशरूम व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती.
सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्ही त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विचार करत असाल, तर एकदा योग्यरित्या प्रशिक्षित घेऊनच हा व्यवसाय सुरु करावा.
मशरूमची शेती
मशरूम चा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. मशरूमची शेती करण्यासाठी योग्य तापमान असणे गरजेचे आहे. मशरूम १५ ते २२ अंश सेंटीग्रेड च्या दरम्यान घेतले जाते. जास्त तापमान असेल तर पीक निकामी होते.
मशरूमची लागवड करतांना आद्रता ८० ते ९० टक्के असावी. मशरूमची वाढ चांगली व्हावी यासाठी कंपोस्ट खत चांगले असणे गरजेचे आहे. फार जुन्या बियाण्यांचा वापर केल्यास मशरूमचा दर्जा घसरण्याची शक्यता असते.
तुम्ही मशरूमचा व्यवसाय हा सरकारकडून अनुदान घेऊन सुरु करू शकता.
मशरूम शेतीसाठी कंपोस्ट खत महत्वाचे
मशरूमची शेती ही ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान केली जात असून मशरूम तयार करण्यासाठी तांदूळ किंवा गव्हाच्या पेंढ्यामध्ये काही रसायने मिसळून कंपोस्ट खत तयार करण्यात येते.
हे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी साधारणतः १ महिना लागतो. एका कठीण जागेवर ६ ते ८ इंचाचा थर देऊन मशरूमच्या बिया पेरल्या जातात आणि त्या बिया कंपोस्ट खताने झाकल्या जातात. जवळजवळ ४० ते ५० दिवसात मशरूम कापून विक्रीसाठी तयार होते.
अधिक नफा मिळवण्यासाठी शेतकरी शेतीबरोबर इतर व्यवसायाच्या शोधात असतो. मात्र नेमका कोणता व्यवसाय करावा हे याचे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
Share your comments