1. कृषीपीडिया

शेती सोबतच करा हा व्यवसाय आणि कमवा भरगोच पैसा विशेष म्हणजे शेतीतूनच करा हा व्यवसाय

रेशीम कापड आणि वस्त्र यांची ओळख गणेश या आराध्य काढून त्यातून रेशीम धागा काढला जातो. देवतेच्या काळापासून सर्वांनाच आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले

रेशीम कापड आणि वस्त्र यांची ओळख गणेश या आराध्य काढून त्यातून रेशीम धागा काढला जातो. देवतेच्या काळापासून सर्वांनाच आहे. कापसापासून होणारे कापड सर्वसामान्याचे वस्त्र असते. रेशीम कापड हे उच्च आर्थिक परिस्थिती असलेल्या नागरिकांचे वसभूषण म्हणून प्राचीन काळापासून मान्यता पावले आहे. रेशीम धागा हा रेशीम अळीच्या ग्रंथीपासून तयार होतो. रेशीम ग्रंथी असलेल्या किटकांच्या अळीपासून रेशीम तंतू निर्माण होतो. अळीच्या ग्रंथीतून निघणारा हा चिकट पदार्थ हवेच्या सान्निध्यात आल्यावर त्याचे रूपांतर धाग्यात होते. हा रेशीम धागा सेरिसोन व फायब्रोनीन नावाच्या प्रथिनांपासून तयार होतो. सेरिसिन प्रथिने हे धाग्याच्या वरच्या भागात आढळतात.

जगात रेशीम उत्पादन करणाऱ्या देशांपैकी बोटावर मोजण्या इतकेच देश रेशमाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतात. रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांक चीनचा भारताचा दुसरा तर जपानचा तीसरा क्रमांक आहे. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असा आहे की, जेथे चारही प्रकारच्या रेशीम अळ्यांचे संगोपन व्यापारी तत्वावर घेतले जाते. यामध्ये तुतीवरील रेशीम अळी, टसार रेशीम अळी, ईरी रेशीम अळी, मुगा रेशीम अळी यांचा समावेश आहे.

१. तुतीवरील रेशीम अळी :

या अळीची वाढ फक्त तुतीच्या पानावरच होते. तुतीची पाने अळ्यांना खाद्य म्हणून लागतात. म्हणून शेतात तुतीची लागवड करून रेशीम अळ्यांचे संगोपन घरात खोलीत करावे लागते. या रेशीम अळ्यांनी विणलेल्या कोषापासून साधारणतः ३०० ते २५०० मीटर लांब धागा निघतो.

२. टसार रेशीम अळी :

विदर्भात बोरांच्या झाडावर कोसले आढळून येतात. प्राचीन काळी चिलीम ओढणारे ग्रामस्थ चकमकीत कोसल्याचा उपयोग चिलीम पेटविण्यासाठी करीत असत. आदिवासी लोक या अळ्यांचे संगोपन जंगलामध्ये करतात. भारताचा टसार रेशीम उत्पादन घेणाऱ्या राष्ट्रात दुसरा क्रमांक लागतो. पुर्ण वाढ झालेल्या अळ्या या झाडांवर कोष तयार करतात.

३. ईरी रेशीम अळी :

ईरी अळ्यांचे संगोपन तुती रेशीम अळ्या प्रमाणेच संगोपन गृहात करतात. भारतात मणिपूर, त्रिपूरा आणि आसाम राज्यात आदिवासी जमातीचे लोक प्रामुख्याने या रेशीम अळ्यांचे संगोपन करतात. ईरी सिल्क वर्मच्या कोसल्यापासून मिळणाच्या धाग्याचा उपयोग प्रामुख्याने रेशमी चादरी, पडदे, उशीच्या खोळी, गालीचे इत्यादी तयार करण्याकरीता होतो. या कोषावरील धागा काढण्यापूर्वी कोष कापून प्युपा (जीव) बाहेर काढला जातो, अहिंसा रेशीम म्हणतात.

४. मुगा रेशीम अळी :

या अळीच्या कोषापासून मिळणारा धागा हा सोनेरी रंगाचा असल्यामुळे ‘गोल्डन सिल्क’ म्हणजेच सोनेरी रेशीम असे संबोधले जाते. व्यापारी तत्वावर मुगा अळीचे संगोपन फक्त ओरिसा राज्यातच केल्या जाते. मुगा रेशीम धाग्याचा जरी कामाकरीता वापर केल्या जातो. एक एकर तुतीच्या लागवडीतून सुमारे ४ ते ५ माणसांना वर्षभर काम मिळते.

जातीवंत अंडीपूंज तयार करणे रेशीम उद्योगात शुध्द अंडी पूंज :

तयार करणे हा रेशीम उद्योगाचा कणा आहे. ‘पेबरीन’ या भयंकर रोगाचा प्रसार अंडी पूंजा मार्फत होते, म्हणून मादी पतंगाने अंडी घातल्यानंतर ती ‘पेबरीन’ रोगमुक्त आहेत किंवा कसे हे तपासणे आवश्यक आहे. जातीवंत अंडी विकत घेवूनच संगोपन अंडी पुंजाची किंमत साधारण ४५ रू. इतकी आहे. एका छोट्या प्रकल्पातून साधारणतः महिन्याकाठी १.५ ते २.० लाखांचे उत्पन्न होवून त्यामध्ये १६ पेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होवू शकतो.

रेशीम किटक संगोपन शेतकऱ्यांनी चांगले जातीवंत अंडी पूंज :

मिळवून संपूर्ण संगोपनाच्या नियमाचे पालन केले तर १०० अंडी पूंजा पासून सर्वसाधारण ३५ ते ४० किलो रेशीम कोष मिळतात. एक हेक्टर तुती लागवडीवर साधारणपणे ४-५ मजुरांना काम मिळते. वर्षभरात ७५० ते ८५० किलो रेशमाचे कोष तयार केल्या जातात.

कोसल्यातून धागा काढणे व त्यास पिळ देणे कोषापासून धागा :

काढणारे व्यापारी रेशमाचे कोष विकत घेवून त्यापासून धागा काढतात. २० ते ४० किलो रेशमाच्या कोषापासून एक किलो रेशीम धागा मिळतो.. धागा गुंडाळणाऱ्या यंत्रावर रेशीम धागा कोषापासून काढून गुंडाळल्या जातो. या यंत्राच्या मदतीने कोषापासून धागा काढल्यानंतर यंत्राव्दारे पीळ देण्यात येतो. तयार झालेल्या रेशमाच्या धाग्याच्या फालींच्या गाठी बांधून ते रेशीम धागे विक्री बाजारात नेऊन विकल्या जातात.

रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्त संगोपन रेशीम किटक संगोपनाचे :

प्रामुख्याने दोन भाग पडतात पहिल्या भागात बाल्यावस्थेतील म्हणजेच दुसऱ्या अवस्थेपर्यंत अळ्यांचे संगोपन या संगोपनाला चाकी रेअरिंग असे सुध्दा म्हटल्या जाते. या अवस्थेत अळ्यांची जास्त निगा राखावी लागते व जास्त बारकाईने लक्ष द्यावे लागते.

संगोपनाची ट्रे पध्दत

अ) १. बाल्यावस्थेतील संगोपन (चौकीरेअरिंग):

प्रथमावस्था अंडीपुंजातून अळ्या बाहेर पडल्यास सुरूवात झाल्यापासून साधारण तीन तासाने तुतीच्या कोवळ्या शेंड्यावरील दोन पाने नंतरची प्रत्येकी दोन ते तीन पाने अळ्यांना खाण्यासाठी द्यावी. पाला खाण्यासाठी अळ्या पाल्यावर चढतात कागदावरील अळ्या पाल्यावर चढल्यावर लाकडी संगोपन ट्रे मध्ये प्याराफीन पेपर अंथरावा. कोंबडीच्या पिसाव्दारे अळ्या संगोपन ट्रे मध्ये साधारणतः २० अंडी पूंजातून निघालेल्या अळ्या टाकाव्यात. प्रथम अवस्थेत अळी पहिले तीन ते चार दिवस असते. यावेळी अळ्यांना दिवसातून चारवेळा पाला बारीक कापून टाकावा लागतो (सकाळी ६, ११,दुपारी ४ व रात्री ९ वाजता) या काळात अळ्यांना लागणारा पाला आर्द्रता व संगोपन ट्रे या बाबी महत्वाच्या असतात.

English Summary: Do this business along with agriculture and earn a lot of money Published on: 02 April 2022, 09:58 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters