1. कृषीपीडिया

असे करावे मिरची लागवड व्यवस्थापन

महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात रोजच्या आहारात लागणारा महत्त्वाचा घटक मिरची हा आहे. महाराष्ट्रात सर्व दूर घेण्यात येणारे हे पीक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सहकार्य करणारे पीक आहे. जिरायत तसेच ओलीता खाली मिरची चे पीक घेता येते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मिरची लागवड व्यवस्थापन

मिरची लागवड व्यवस्थापन

महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात रोजच्या आहारात लागणारा महत्त्वाचा घटक मिरची हा आहे. महाराष्ट्रात सर्व दूर घेण्यात येणारे हे पीक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सहकार्य करणारे पीक आहे. जिरायत तसेच ओलीता खाली मिरची चे पीक घेता येते. खरीप रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेता येणारे हे पीक आहे. महाराष्ट्रातील मिरचीला परदेशात सुद्धा मोठी मागणी आहे. 

१. रोप तयार करणे :

मिरची हे पिक से रोप तयार करूनच लागवड करावी लागते. रोप लागवडीसाठी चार ते पाच गुंठे क्षेत्रात रोपवाटिका तयार करावी. निचरा होणारी जमीन निवडावी. चुनखडीच्या क्षेत्रात लोक रोप टाकू नये. हे क्षेत्र चांगल्या प्रकारे भुसभूशीत करून घ्यावे. "गादीवाफे" तयार करावेत. गादीवाफे तळ्यात १ मीटर रुंद व १ फूट उंच असावे व लांबी २ मीटर व रुंदी अडीच ते तीन फूट पर्यंत करावी. गादीवाफे तयार करताना डी.ए.पी एक किलो, हाय पावर ५०० ग्राम व शक्ती गोड ५०० ग्राम व फोरेट २०० ग्राम मिश्रण करून प्रति वाफा शिंपावे एक गुंठा क्षेत्रात १६ ते १८ वाफे होतात.

गादीवाफ्यावर चार इंचाच्या अंतरावर बोटाने अर्धा इन खोलीच्या रेषा ओढाव्यात. प्रथम बी हलके फेकावे व मातीने झाकून द्यावे व झरिने हलके पाणी द्यावे. दोन ते तीन दिवसात परत झारीने पाणी द्यावे. ६ ते ७ दिवसानी ह्युमिक जेल ५० ग्राम, बाविस टिन ५० ग्राम झारी मध्ये कालवून वाफ्यात पाणी सोडून त्यावर सोडावे. रोपे ३० ते ३५ दिवसात लागवडीसाठी काढता येतात. या क्षेत्रावर नायलन जाळीचे आच्छादन करावे. 

२. जमिनीची मशागत :

जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत करून घ्यावी. सुपर फास्फेट दाणेदार १ बॅग व फोरेट अथवा थिमेट ६ किलो प्रती एकरी शिंपडावे व पाळी करून घ्यावी. शेणखत प्रक्रिया केलेले असल्यास पसरवून घ्यावे. "कुळवाच्या" ३ ते ४ पाळ्या करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. 

३. लागवड:

लेव्हल व पूर्ण मशागत केल्यानंतर लागवडीकरिता साऱ्या पाडाव्यात. हलक्‍या जमिनीत ३x३ फूटावर तर ओलीता खालील भारी जमिनीत ५x२ फुटावर अंतर ठेवावे. ४३६० ते ४८४० रोपे लागतील. या अंतरामुळे पाण्याची बचत, झाडाची उत्तम वाढ, आंतर मशागत तोडणे सोपे जाते. ठिबक असल्यास विद्राव्य खते देता येतात व खताची बचत होते. 

४. रोग प्रक्रिया :

लागवड करण्यापूर्वी रोग प्रक्रिया करणे गरजेचे आहे. ह्युमिक जल १०० ग्राम व बाविसटिन ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पंपात भरून सर्व रोपावर मुळापासून शेंड्यापर्यंत फवारणी करावी अथवा २० लिटर पाणी तयार करून त्यातून रोप बुडवून काढावी. 

५. पहिली ड्रिंचिंग :

लागवडीपासून ३ ते ४ दिवसात पहिली ड्रिंचिंग करावी. प्रति १५ लिटर पंपात ह्युमिक जेल १०० ग्राम, ब्ल्यू कॉपर ५० ग्राम.

ठिबक असलेल्या ह्युमिक जेल १ किलो, ब्ल्यू कॉपर ५०० ग्राम यांचे २०० लिटर द्रावण तयार करून प्रति एकर सोडावे. 

 

६. खतांची पहिली मात्रा :

लागवडीपासून 16 ते 18 दिवसात खतांची पहिली मात्रा टाकावी. 

२०:२०:०:१३ - 1 बाग

पोटॅश - २५ किलो

हाय पावर - १०किलो

शक्ती गोड - १० किलो

प्रती एकर.

 

जर मलचिंग कारावयाचे असल्यास तत्पूर्वी हे खत टाकावे

 

७. पहिली फवारणी :

लागवडीपासून २० ते २२ दिवसात पहिली फवारणी करावी. 

ह्युमिक जेल २५ ग्राम

चालेन्जर ५ मिली

इंट्राकॉल २० ग्राम

माईट किंवा बायो ३०३ - 25 मिली

८. दुसरी फवारणी :

लागवडीपासून ३५ ते ४० दिवसांनी दुसरी फवारणी

चमतकार ५ मिली

फ्लावर स्ट्रॉंग २५ मिली

उलाला ६ ग्रम

निंबोळी अर्क 40 मिलिंग १,००० पीपीएम

 

 

९. दुसरा खाता चा डोस :

१०:२६:२६ एक बॅग

मॅग्नेशियम पाच किलो

बोरॉन दोन किलो

सल्फर तीन किलो

प्रति एकरी. 

 

१०. तिसरी फवारणी:

अमिनो जेल - २५ ग्राम

कॉम्बो २५ ग्राम

नेम हंटर २० मिली

प्रति पंप.

English Summary: Do also chilli planting management Published on: 25 January 2022, 05:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters