कारण शेवटी अपेक्षा ह्या न संपणाऱ्या आहेत त्यामुळे आहे त्यातच समाधानी राहणं खूप महत्त्वाचं आहे. जग बदललंय. आपणही बदला. येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून खूप काही साठवून ठेवण्याच्या विचारात पडूच नका. लोकं पाच पंचवीस हजार पगारात टाप टिप राहतात आणि आनंदात जिवन जगतात. तुमच्या कष्टातून जे पैसे येतील त्यातील पन्नास टक्के जरी खर्च केले तरी खूप आनंदी जीवन तुम्ही जगू शकता. आपल्या वाडवडीलांनी खूप काही भोगलं ते आपल्यालाचांगले दिवस यावेत म्हणून. तो उद्देश त्यांचा पूर्ण होऊ द्या. स्वतःच्या व्यक्तीमत्वाला जपा. वेगवेगळे छंद जपत चला. समाजात मिसळताना टापटीपपणे रहा. कारण शेवटी शेतकरीच या जगाचा पोशिंदा आहे, तो जगाला तरच देश जगेल, शेतकरीच या देशाचा मोठा ब्ँड आहे.
काही गोष्टी दुर्लक्षित राहिल्या म्हणून शेतकरी हा ब्रँड व्हायचा सोडून आऊटडेटेड होत चालला आहे, उगाच शेतकर्यांना पोरी पण देत नाही असं म्हणून स्वतः वरच टिका करत बसू नका. तुमची लाईफ स्टाईल सुधारा आपोआप सर्व गोष्टी बदलतील. शेवटी आपल्या हातात आहे कोणाला कसं जगवायच. कष्ट करू वाटत नाही म्हणून शेतीत काहीच नाही म्हणणारी अनेक रिकामटेकडी माणसं भेटतील.
शेती न पुरणारा व्यवसाय आहे त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कोणी काहीही म्हणो या जगात शेती शिवाय दुसरा चांगला पर्यायच नाही हे सत्य आहे...!! प्रगतशील असण्याबरोबरच प्रयोगशील बना. कारण प्रयोगशील बनल्यावरच आपण शेती चांगली व परवडणारी शेती करू शकू, त्याचबरोबर शेतीतील तंत्रज्ञान स्वीकारत चला,
चांगले कपडे, चांगले विचार, चांगले राहणीमान ही काळाची गरज आहे हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. शेती हा खूप चांगला आणि परवडणारा व्यवसाय आहे कारण मीसुद्धा एक शेतकरी पुत्र आणि कृषीचा विद्यार्थी आहे, लवकरच शेतीला ब्रँड बनवू हा निर्धार मनात ठेवून काम करूया.
Share your comments