औरंगाबाद : मराठवाड्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून, आठपैकी 7 जिल्ह्यांतील तब्बल 387 गावांना पुराचा फटका बसला आहे. यात 52 हजार 149 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर अजूनही 14 हजार 908 हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके पाण्याखालीच आहेत. दरम्यान, गेल्या 40 दिवसांत विभागात 111 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.मराठवाड्यात दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली असतानाच पावसाने कमबॅक केले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून विभागात कुठे मुसळधार, तर कुठे हलक्या व मध्यम स्वरूपाच्या
पावसाला सुरुवात झाली आहे. 2 जुलैपासून विभागात सर्वदूर संततधार सुरू आहे. यात 8 ते 11 जुलैदरम्यान नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांना पावसाने झोपडले आहे. यामुळे नदीला आलेल्या पुराचा तब्बल 387 गावांना फटका बसला आहे. यात नांदेडमधील सर्वाधिक 310 गावांचा समावेश आहे, तर हिंगोली 62, लातूर 8, परभणी 3, उस्मानाबाद 2 आणि जालन्यातील 1 गाव आहे. या पावसामुळे विभागातील 48 हजार 533 हेक्टर जिरायती, 3 हजार 586 हेक्टर बागायती आणि 30.17 हेक्टर फळबाग शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाच मंडळांतील तब्बल 14 हजार 908 हेक्टर खरीप पिके अजूनही पाण्याखालीच असल्याची माहिती
विभागीय आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, विभागात यंदाच्या मोसमात 1 जून ते 11 जुलै या दीड महिन्यात 446 मंडळांपैकी 111 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात 96 मंडळांत दोन वेळा तर 8 मंडळांत दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यात वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने 24 जणांचा मृत्यू झाला आहे. विभागात झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्यात यावा, असे आदेश विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिले आहेत. खरिपाची 72.68 टक्के पेरणी मराठवाड्यात यंदा खरीप हंगामाचे पेरणी क्षेत्र 49 लाख 6 हजार 373.64 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 35 लाख 65 हजार 811 हेक्टर म्हणजेच 82.68 टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. यात सर्वाधिक 17 लाख 43 हजार 550 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल 11 लाख 23 हजार 910 हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली आहे.
मराठवाड्यात दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली असतानाच पावसाने कमबॅक केले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून विभागात कुठे मुसळधार, तर कुठे हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. 2 जुलैपासून विभागात सर्वदूर संततधार सुरू आहे. यात 8 ते 11 जुलैदरम्यान नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांना पावसाने झोपडले आहे. यामुळे नदीला आलेल्या पुराचा तब्बल 387 गावांना फटका बसला आहे. यात नांदेडमधील सर्वाधिक 310 गावांचा समावेश आहे, तर हिंगोली 62, लातूर 8, परभणी 3, उस्मानाबाद 2 आणि जालन्यातील 1 गाव आहे. या पावसामुळे विभागातील 48 हजार 533 हेक्टर जिरायती, 3 हजार 586 हेक्टर बागायती
Share your comments