1. कृषीपीडिया

Crop Management: पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता वेळीच ओळखा; मिळेल भरघोस उत्पन्न

शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) नवनवीन प्रयोग करून चांगली पिके (crops) घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र चांगल्या उत्पादनासाठी शेतातील पिकांमध्ये नेमक्या कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे हे शेतकऱ्यांना (farmers) माहीत असणे गरजेचे आहे.

Crop Management

Crop Management

शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) नवनवीन प्रयोग करून चांगली पिके (crops) घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र चांगल्या उत्पादनासाठी शेतातील पिकांमध्ये नेमक्या कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे हे शेतकऱ्यांना (farmers) माहीत असणे गरजेचे आहे.

पिकांमधील मूलद्रव्याची कमतरतेची (Elemental deficiency) नेमके लक्षण कोणती आहेत? याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

अशी ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता

1) नत्र

झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.

2) स्फुरद

पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

3) पालाश -

पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

Beans Farming: बिन्स शेतीतून शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांचा निव्वळ नफा; जाणून घ्या सविस्तर

4) जस्त -

पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

5) लोह -

शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ खुंटते.

6) तांबे

पिकांच्या (crops) शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

Zero Budget Farming: झीरो बजेट शेतीमध्ये लाखोंचा नफा; पैसे खर्च न करता मिळणार बंपर उत्पादन

7) बोरॉन -

टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात.

9) मॉलिब्डेनम -

पाने फिक्कट हिरवी (Leaves green) पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात. पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

10) गंधक -

झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.

महत्वाच्या बातम्या 
Pm Kisan Yojana: शेतकरी मित्रांनो 'या' गोष्टी त्वरित करा; अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत
E Crop Inspection: 'ई पीक पाहणी' प्रक्रियेत होणार मोठा बदल; नवीन ॲप लॉन्च
Groundnut Crop: भुईमूग पिकावरील किडीचे करा असे नियंत्रण; मिळेल भरघोस उत्पन्न

English Summary: Crop Management Early detection nutrient deficiencies crops income Published on: 13 August 2022, 12:28 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters