1. कृषीपीडिया

काळ्या आईची निर्मिती!250 कोटी वर्षाहून अधिक काळ लागला माती तयार होण्यासाठी,कसं बरं चालेल मातीकडे दुर्लक्ष करून

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आपल्या शेतीचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा घटक म्हणजे जमीन होय. ती म्हणजे आपल्या जमिनीतली काळी माती ही माती काही सगळीकडे सारखी नाही हे आपणास माहीत असेल येथे हरएक शेतीमधे मातीचा बदल दिसून येते. काही ठिकाणी ती पांढरीही आहे आणि काही भागात ती लाल ,पीवळी आहे. पण तरीही जमिनीला काळी आई म्हणतो. या पृथ्वीतलावर जमिनीत मशागत करून आणि पिके घेऊन शेती केली जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
creation of soil and so important to preserve fertility of soil

creation of soil and so important to preserve fertility of soil

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं आपल्या शेतीचा सर्वात प्रमुख आणि महत्वाचा घटक म्हणजे जमीन होय. ती म्हणजे आपल्या जमिनीतली काळी माती ही माती काही सगळीकडे सारखी नाही हे आपणास माहीत असेल येथे हरएक शेतीमधे मातीचा बदल दिसून येते. काही ठिकाणी ती पांढरीही आहे आणि काही भागात ती लाल ,पीवळी आहे. पण तरीही जमिनीला काळी आई म्हणतो. या पृथ्वीतलावर जमिनीत मशागत करून आणि पिके घेऊन शेती केली जाते.

माणूस सुधारला आणि चंद्रावरच नव्हे तर सूर्यावर जरी गेला तरी त्याला पोटाला खायला काही तरी लागतेच. त्याने कितीही प्रगती केली तरी हे सत्य काही बदलणार नाही. त्यामुळे मानवी जीवनात कितीही बदल झाले आणि परिवर्तने झाली तरीही पोटाची खळगी कायम आहे आणि त्यामुळे शेती व्यवसाय अटळ आहे, शाश्‍वत आहे.

नक्की वाचा:शेतीही करा,उद्योजकही व्हा! करा गुंतवणूक दोन लाख रुपयांची अन सुरु करा 'टोमॅटो सॉस'युनिट, वाचा माहिती

कधी काळी या पृथ्वीतलावरची शेतीच बंद झाली आहे असे काही घडणार नाही आणि शेती हा इतका शाश्‍वत धंदा असेल तर मातीचे महत्वही अबाधित आहे.

तेव्हा आपण ज्या मातीत शेती करणार आहोत ती माती नेमकी काय आहे याची नीट माहिती करून घेतली पाहिजे. प्रत्येक शेतकरी हा काही किमान शास्त्रांची माहिती असणारा शास्त्रज्ञच असतो. नसेल तर तो तसा असला पाहिजेहे अशासाठी गरजेचे आहे की,

आपल्या शेतातल्या मातीचा सुपीक थर म्हणजे काय आणि तो कसा तयार झालेला आहे हे त्याला माहीत असेल तरच त्याला त्या थराची किंमत कळेल आणि त्याचा लहानसाही थर वाहून जाता कामा नये याची तो खबरदारी घेईल. आपण ज्या मातीत मेहनत करतो ती माती मुळात खडकापासून तयार झाली आहे. ही पृथ्वी काही अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे.

नक्की वाचा:बिझनेस आयडिया 2022: घरी बसून कांद्यापासून बनवा 'हा' पदार्थ आणि लाखो रुपये कमवा, वाचा संपूर्ण माहिती

 ती नेमकी किती वर्षांपूर्वी अस्तित्वात आली यावर शास्त्रज्ञात वाद आहेत. प्रत्येकांच्या अंदाजात काही कोटी वर्षांचा फरक असेल. पण एवढे खरे की, ती अस्तित्वात आली तेव्हा तिच्या पृष्ठभागावर तीन चतुर्थांश पाणी होते आणि उरलेला एक चतुर्थांश भाग खडकाळ जमीन होती.

म्हणजे आपण शेती करतो ती जमीन किंवा सुपीक माती या खडकांपासून बनलेली आहे. या खडकावर उष्णता, पाऊस, वारा, थंडी यांचे परिणाम होत गेले. दिवसभर उष्णता असते, त्यामुळे खडक तापून . रात्री तापमान कमी झाले की हेच खडक आकसत जाते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू राहिली आणि सुरू आहे.

हे फुगवणं आणि आकसणं अतिशय सूक्ष्म असते. पण असे संस्कार होत होत दगडांची माती तयार व्हायला २५० कोटी वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला आहे.हे सर्व प्रकारच्या खडकांच्या बाबतीत घडते. काही खडक मुळात ठिसूळ असते, त्यांच्या बाबतीत ही क्रिया लवकर घडते.

पण मातीचा एक फुट जाडीचा थर तयार व्हायला १०० वर्षे लागतात. हे अशासाठी सांगत आहे की, पावसाळ्यात जोरदार पावसाने शेतातली माती वाहून जाते, हे किती मोठे नुकसान होत आहे हे कळावे म्हणून मी वारंवार सुचीत करतं असतों....

धन्यवाद

 विचार बदला जिवन बदलेल

 मिलिंद जि गोदे

  save the soil all together........ milindgode111@gmail.com...... mission agriculture soil information_

नक्की वाचा:अनमोल लाकूड! 'हे' लाकूड विकले जाते करोडोमध्ये;प्रत्येकाला नाही करता येत लागवड,वाचा सविस्तर माहिती

English Summary: creation of soil and so important to preserve fertility of soil Published on: 19 July 2022, 06:02 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters