1. कृषीपीडिया

अनमोल लाकूड! 'हे' लाकूड विकले जाते करोडोमध्ये;प्रत्येकाला नाही करता येत लागवड,वाचा सविस्तर माहिती

चंदनाच्या शेतीला चालना देऊन उपजीविकेच्या संधीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.यासोबतच शेतकऱ्यांना सध्याच्या समस्या आणि भविष्यातील शक्यतांची जाणीव करून देऊन शेती उत्पन्नाचा स्तर वाढवला जात आहे. लाल चंदनासह मौल्यवान चंदन प्रजातीपासून भारतीय बऱ्याच काळापासून वंचित होते. हे झाड कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न देऊ शकते आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी जास्त काळजी करण्याची देखील गरज नसते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
red sandelwood

red sandelwood

चंदनाच्या शेतीला चालना देऊन उपजीविकेच्या संधीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.यासोबतच शेतकऱ्यांना सध्याच्या समस्या आणि भविष्यातील शक्यतांची जाणीव करून देऊन शेती उत्पन्नाचा स्तर वाढवला जात आहे. लाल चंदनासह  मौल्यवान चंदन प्रजातीपासून भारतीय बऱ्याच काळापासून वंचित होते. हे झाड कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न देऊ शकते आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी जास्त काळजी करण्याची देखील गरज नसते.

 लाल चंदनाच्या बाबतीत महत्त्वाचे मुद्दे

 लाल चंदनाचे झाड हे चंदनाची संथ वाढणारी प्रजाती आहे. ज्याचा रंग लाल असतो आणि कठोर हवामानात देखील त्याचा आकार आणि पोत खराब होत नाही.

आंध्रप्रदेशात लाल चंदनाची लागवड भारतातील इतर राज्यांपेक्षा अधिक यशस्वी आहे कारण तेथे व्यवसायिक चंदन शेती साठी अनुकूल हवामान आहे.

लाल चंदन हे शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक असून सदाहरित वृक्ष असून ते कोणत्याही ऋतूत वाढू शकते. परंतु कृषी तज्ञांच्या मते कडाक्याच्या थंडीत लाल चंदनाची लागवड करणे टाळावे.

नक्की वाचा:Dry Farming Technology: कोरडवाहू शेतीचे करा नंदनवन ! हे तंत्रज्ञान वापरून कमी पाण्यात फुलवा शेती

लाल चंदनाचे झाड स्थानिक असून दक्षिण भारतातील पर्वत रांगांमध्ये पूर्व घाटात आढळते. लाल चंदन ही सुगंधी वनस्पती नाही परंतु लोक सहसा संतलम चंदनाला लाल चंदन समजतात व लोकांचा गोंधळ उडतो.

परंतु संतलम चंदन ही वेगळी चंदनाचे वनस्पती आहे आणि मूळचे हे भारतात उगवणारी सुगंधी चंदनाचे झाड आहे. लाल चंदनाची झाडे संपूर्ण भारतात पाचअंश सेल्सिअस ते 47 अंश सेल्सिअस दरम्यान सहजपणे वाढतात.परंतु सगळ्यात अगोदर तुमच्या राज्यात लागवडीची परवानगी आहे की नाही हे तपासण्याची आवश्यकता आहे.

 लाल चंदनाची लागवड

1- चिकन माती आणि लाल मातीत लाल चंदन लागवड केली जाते.

2-मे ते जून हा कालावधी लाल चंदन लागवडीसाठी योग्य समजला जातो.

3- एप्रिल मार्च मध्ये रोपवाटिकेत याची लागवड केली जाते त्यानंतर मे आणि जूनमध्ये रोपण केले जाते.

4-लाल चंदन कोरड्या व उष्ण हवामानात चांगली वाढते.

5- 10 बाय 10 फूट अंतरावर लागवड करावी.

6-पहिली दोन वर्ष तणमुक्त वातावरणात त्याची जोपासना करावी.

7- जमीन चांगली नांगरून चार मीटर बाय 4 मीटर अंतरावर 45 सेंटिमीटर बाय 45 सेंटिमीटर बाय 45 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदले जातात.

8- रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी देणे गरजेचे असते. नंतर हवामानाच्या स्थितीनुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन केले जाते.

नक्की वाचा:Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरींची गरजचं नाही…! 'या' पिकाची शेती करा पाच महिन्यात 30 लाख कमवा

9- लाल चंदनाला तीन पानांची त्रिकोणी पाने असतात. पाने खाणारा सुरवंट मे महिन्यात त्याच्या झाडांमध्ये आढळतो. त्याच्या नियंत्रणासाठी 0.2 टक्के मोनोक्रोटोफास आठवड्यातून दोनदा फवारणी करावी.

10- लाल चंदनाचे झाड दीडशे सेंटीमीटर ते 200 सेंटीमीटर परिघासह 15 ते 17 मीटर उंचीपर्यंत वाढते.

11- लाल चंदनाच्या झाडाला कुठल्याही वन्य प्राण्यांपासून नुकसान होण्याची भीती नसते कारण त्याच्या वासामुळे असे प्राणी झाडाच्या जवळ येत नाही. लाल चंदनाचे झाड वालुकामय आणि बर्फाच्छादित क्षेत्र वगळता कोणत्याही भागात वाढू शकते.

 चंदनाची लागवड प्रकार

 लाल चंदनाची लागवड सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने करता येते. सेंद्रिय चंदनाची झाडे वाढण्यास सुमारे दहा ते पंधरा वर्षे लागतात तर पारंपारिक चंदनाची झाडे वाढण्यास सुमारे पंचवीस ते तीस वर्ष लागतात.

 लाल चंदनाच्या जाती

 नागमोडी पट्टे आणि सरळ पट्टे असलेले लाल चंदनाचे दोन प्रकार आहेत. लहरी चंदनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मागणी जास्त आहे. नागमोडी पट्टेदार चंदनाचा वापर प्रामुख्याने व्यवसायिक चंदन लागवडीसाठी केला जातो.

नक्की वाचा:Sprey On Crop:असेल पाण्याचा दर्जा चांगला तर येईल फवारणीचा रिझल्ट चांगला, वाचा सविस्तर माहिती

चंदन लागवडी बाबत निष्कर्ष

भारतीय चंदन हे जगातील सर्वात मौल्यवान व्यवसायिक लाकूड मानले जाते. सध्या चंदनाचे लाकूड आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या तेलासाठी त्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे.

2001 आणि 2002 मध्ये वाढत्या चंदनाच्या लाकडाची संबंधित नियमांचे उदारीकरण झाल्यापासून संपूर्ण भारतातील शेतकरी आणि भागधारकांमध्ये या झाडाच्या लागवडीबद्दल प्रचंड रस निर्माण झाला आहे. आपल्या भारतीय परंपरेत चंदनाला विशेष स्थान आहे

जेथे पाळणा ते अंत्यसंस्कारापर्यंत चंदनाचा वापर केला जातो. सौंदर्यप्रसाधने, फार्मासिटिकल, अरोमा थेरपी, साबण उद्योग आणि परफ्यूम बनवणाऱ्या उद्योगामध्ये चंदन आणि त्याच्या आवश्यक तेलाचे व्यावसायिक मूल्य प्रचंड आहे. मात्र भारतातील काही राज्यांनी चंदनाच्या लागवडी वरील बंदी उठवली आहे. तुमच्या क्षेत्रात चंदनाची लागवड कायदेशीर आहे की नाही हे तुम्ही तुमच्या वन, कृषी विभागाशी संपर्क साधून तपास करू शकता.

English Summary: red sandalwood is so precious wood in world that use in many production Published on: 19 July 2022, 05:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters