प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर बरेच शेतकरी करतात. मल्चिंगचा जास्त करून उपयोग हा मुख्यत्वेकरून भाजीपाला पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. मल्चिंग पेपरच्या वापराने पाण्याचे बाष्पीभवन कमी होत असल्यामुळे पाण्याची बचत होते.
त्यासोबतच तण उगवत नसल्यामुळे निंदणीचा खर्च वाचतो.तसे बरेच फायदे मल्चिंग पेपरचे आहेत. परंतु अलीकडेच दिल्ली येथील एका संस्थेने सर्वेक्षण केले आणि त्यामध्ये आढळून आले की, मल्चिंग साठी प्लास्टिक वापरले जाते त्यामुळे मातीचे आरोग्य बिघडते आहे.
कारण ते प्लास्टिक कुजल्या नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे मातीत मिसळतात आणि माती प्रदूषित करतात. या सर्वेक्षणात दिसून आले की यामुळे माती प्रदूषण होत आहे, शेतकऱ्यांसाठी आणि एकंदरीत शेती उद्योगासाठी खूप घातक आहे.
परंतु आता काळजी करण्याची गरज असून आता प्लॅस्टिक मल्चिंग ऐवजी कोकोपीट चे मल्चिंग सीट बनवले जात आहे.
प्लास्टिक मल्चिंगच्या वापराने मातीचे प्रदूषण होत असल्यामुळे कृषी शास्त्रज्ञ सेंद्रिय मल्चिंगचा वापर करण्याचा सल्ला देतात. कारण या सेंद्रिय मल्चिंग वापराचे भरपूर फायदे आहेत. जमिनीतील ओलावा बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतो.
त्यामुळे शेतात तणांची वाढ देखील जास्त होत नसल्याने खर्च कमी होतो. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पिकामध्ये तन झाले नसल्यामुळे पोषक द्रव्य पिकांना जास्त प्रमाणात मिळतातव निंदणी चा खर्च वाचल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची बचत देखील होते.
नक्की वाचा:ऊस पिकात वाढतोय अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळीच करा नियंत्रण
कोकोपीट ( सेंद्रिय) मल्चिंग आहे प्लास्टिक मल्चिंग पेक्षा जास्त टिकाऊ
या मल्चिंग चे फायदे लक्षात घेऊन कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पेंढा किंवा पानांसाठी मल्चिंग करण्यास सांगतात.
परंतु आता हे मल्चिंग अशा पद्धतीचे आहे की याचा वापर करून शेतातील माती ला कुठलाहीप्रकारचे नुकसान होत नाही.तसेच जमिनीची सुपीकता देखील टिकण्यास मदत होते. हे मल्चिंग कोकोपीट ने तयार केले असून केरळ राज्यातील बहुतांश शेतकरी याचा वापर करत आहेत.
प्लास्टिक मल्चिंग पेक्षा जास्त टिकाऊ असून या कोकोपीट मल्चिंग ची जाडी 15gsm पर्यंत आहे. जर आपण टिकाऊपणा चा विचार केला तर प्लास्टिक मल्चिंग च्या तुलनेत हे चार ते पाच वर्ष जास्त ऐकत आहे. तसेच या द्वारे विविध ऋतूमध्ये जैव पदार्थांचे प्रमाण बदलता येते.
प्रति चौरस मीटर 5.0 किलो कोरड्या बायोमासचे आच्छादन जमिनीचे आरोग्य मध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते व तनांचे प्रमाण कमी करू शकते.
जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी खूप परिणामकारक आहे. नैसर्गिक शेती अंतर्गत जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी या कोकोपीट मल्चिंग ही भूमिका खूप महत्त्वाची आहे.
नक्की वाचा:तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या सोयाबीन मधील महत्वाची किड माहिती आणि व्यवस्थापन
Share your comments