1. कृषीपीडिया

हवामान बदलांमुळे होत आहे शेतीवर अनिष्ट परिणाम

येत्या काळात शेती पद्धती व हवामान बदल यांचा विचार करणे गरजेचे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हवामान बदलांमुळे होत आहे शेतीवर अनिष्ट परिणाम

हवामान बदलांमुळे होत आहे शेतीवर अनिष्ट परिणाम

यावर्षी आपण सुरवातीपासून बघतो आहे की शेती ही नैर्गिकदृष्टया संरक्षित राहिलेली नाही, सुरवातीला पावसाने उघाड दिली, काही ठिकाणी पेरणी झाली तर काही ठिकाणी एक महिना उशिरा झाली. काही भागात जास्त प्रमाणात पाऊस झाला तर काही भागात दुष्काळ पडला. 

 सोयाबीन पिक काढणीला आले तेव्हा अतिृष्टीमुळे नुकसान तर आता परत अवकाळी पावसामुळे हरबरा, गहू ,तूर, कांदा या पिंकांचे नुकसान होत आहे, गेल्या १५ दिवसांपासून ढगाळ व पावसाचे वातावरण आहे, कांदा, गहू तसेच हरबरा या पिकांना सुरवाीपासूनच थंड व कोरड्या हवामानाची आवश्यकता असते परंतु या हंगामात असे कुठेही दिसत नाही उलट पाऊस येत आहे व सतत चे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पिकाची वाढ होत नाही तसेच रोग व कीटक यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. यासर्व गोषटींबरोबरच आपल्याला हे का होतेय याचा विचार करणे गरजेचे आहे

हे नैसर्गिक वाटत असले तरी माझ्यामते मानवनिर्मित च आहे, कारण हवामान बदलला जर कोणी जिम्मेदार असेल तर ते आपणच आहोत, आपण आपल्या स्वार्था साठी निसर्गाला चॅलेंज करत आलो आहोत, त्यामुळे येणाऱ्या काळात शेतीसाठी हवामान बदल हा विषय अतिशय आव्हानात्मक ठरणार आहे.त्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली तसेच शेती पद्धती या मध्ये आजच बदल करणे आवश्यक आहे. उजाड झालेली माळराने व जंगले आपल्याला भरून काढावी लागणार आहेत.आजच या गोष्टींचा विचार करून, आपल्या शेतामध्ये १० वर्षा पूर्वी किती झाडे होते व आज किती आहे हे जर बघितले तर आपणच आपले गुन्हेगार आहोत असे वाटेल.

अजून वेळ गेलेली नाही आपण ठरवले तर वातावरण बदल / हवामान बदल यावर मात करू शकतो, आपल्याला जर २०३० नंतर शेती ही नफ्याने करायची असेल तर आज झाडे लावने व ते जगवणे हा एक च उपाय आहे. येणाऱ्या काळात शेतीवर होणारा खर्च खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे; त्यात आपण टिकू का त्यासाठी आपल्याला आपली शेती पद्धती हवामान बदल यांचा विचार करून करणे आवश्यक आहे.

आज सरकार ने मोठे पाऊल उचलून शेतमालाला हमी भाव देणे आवश्यक आहे.

कोल्ड Storage असतील किंवा गोडाऊन असतील हे गावी म्हणजे ज्या गावात जे पीक पिकते तिथे त्या साठी चे काढणी पश्चात तंत्रज्ञान पोहचले पाहिजेत, जेणेकरून नासाडी होणार नाही. सरकार २००० महिना देते निवडणूक आली की कर्ज माही देते, अतिवृष्टी झाली की मदत देते, परंतु या खरच कायमस्वरूपी उपाययोजना आहेत का? यांचा विचार करून भविष्यकाळात शेतकरी कर्जबाजारी होणार नाही किंवा त्याला सरकारी मदतीची गरज पडणार नाही अशा योजना आणायला हव्यात.

 या सर्व ज्या योजना आहेत त्या फक्त निवडणूक लक्षात घेऊन आणल्या जातात पक्ष कोणताही असो, या सर्व योजनावरती होणार खर्च जर  कायम स्वरुपी नियोजन  हमी भाव हमी खरेदी  मार्केट चैन यावर केला तर खूप मोठी क्रांती होऊ शकते.

शेती हा व्यवसाय नैसर्गिक गोष्टीवर आधारित आहे केव्हा काय होईल सांगता येत नाही त्याच बरोबर शेती ही दुसऱ्या बाजूला म्हणजे सर्व पणे अवलंबून म्हणजे मजूर खत- औषध कंपन्या# कृषी सेवा केंद्र मार्केट व्यापारी सरकार # यासर्व प्रकारामुळे शेती मागे आहे,  परंतू  विचार केला तर शेतीवर हे जग देश सरकार आणि जनता अवलंबून आहे (कारोना काळात lockdoun ने सर्वांना दाखवून दिले आहे ) या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे,

 शेतीला भविष्यकाळात चांगले दिवस बघायचे असतील किंवा शेतकरी वर्गाला चांगले जीवन जगायचे असेल तर आजच सर्व बाजूंनी विचार करून पाऊल उचलने आवश्यक आहे.

 

शेती / शेतकरी: समृद्ध तरच जग समृद्ध 

डॉ अनंत उत्तमराव इंगळे

( Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri

English Summary: Climate change disadvantage on farming Published on: 06 January 2022, 01:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters