1. कृषीपीडिया

कारले लागवड आणि रोगनियंत्रन

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कारले लागवड आणि रोगनियंत्रन

कारले लागवड आणि रोगनियंत्रन

ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते

2.जाती

चांगल्या उत्पादनासाठी ,nirmal seeds, 6214,वेटुरेआ (महिको), झालर (डॉक्टर), एनएस 452 (नाम धारी), विवेक (सनग्रो), करण (पहुजा), बीही-1 (व्हीएनआर) ) या जातींची निवड करा..

पेरणी आणि लागवड पद्धती

चांगल्या वाढीसाठी लागवड जुन-जुलै मध्ये करावी.लागवडीचे अंतर 1.5 X 1 मी. किंवा 2.0 X 0.5 मी. ठेवावे.लागवडीसाठी 800gm ते 1 किलो बियाणे प्रती एकर लागते.

उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करावी. पीकवाढीच्या अवस्थेत सुरुवातीचे जास्त असलेले नको असलेले फुटवे काढत वेलास बांधणी करुण आधार द्यावा. बाजारात उपलब्ध असलेले नायलॉन मंडप साठी वापरावे.

जैविक खते

लागवडीपूर्वी 15 टन शेणखत किंवा 500 किलो एरंड पेंड प्रती एकर द्या.

रासायनिक खते

चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया)+20 किलो फॉस्फरस (125 किलो एसएसपी) + 20 किलो पोटॅशियम (33 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या. चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया किंवा 97किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर लागवडीनंतर 30-35 दिवसांनी द्या.

पाण्यात विरघळणारी खते

फुलगळ रोखण्यासाठी,उत्पादनात 10% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड @3ml + MAP (12: 61: 00) @5gm/Ltr पाण्यातून फवारा. फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड(ऍस्पिरिन टॅबलेट 350mg,4-5गोळ्या)/15Ltr पाण्यातून 30दिवसाने 1/2वेळा फवारा. चांगली फुलधारणा व उत्पादन मिळण्यासाठी 00: 52: 34 @150 gm / 15 Ltr पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा . चांगले उत्पादन व गुणवत्ता मिळण्यासाठी 13: 0: 45 @ 100g/10 Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) 1 ml/Ltr पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा .

कीड नियंत्रण

फळ माशी

हे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात व त्यामुळे फळगळ दिसून येते.वेळोवेळी बाधित फळे काढून नष्ट करा.पिकाच्या काढणी नंतर उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करा. मुख्य पिकाबरोबर विलायती गवत,मुळा,कोथिंबीर या पिकांची लागवड एकाच शेतात करू नका.रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.

 

पांढरी माशी

पांढरी माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr

 ताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा

पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20

 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अॅफसिफेट

 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6

 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.

अंकुर आणि मुळे खाणारी अळी

अळी पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान 3G (फुराडन/फुरान/कार्बोमाइन) 12 kg प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल 5%SC (रेजेंट, सॅल्वो)500 ml किंवा क्लोरपायरीफॉस 20EC (ट्रेकडेन, फोर्स, ताफबन) 2 Ltr सिंचनाच्या पाण्यासोबत द्या किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड 80WG (लेसेंटा) 150 ml 250 Ltr पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.

पान पायांचा ढेकूण

गर्द काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते.अंकुर वळतात व फळांवर गर्द काळा वर्तुळाकार ठिपका दिसून फळे गळतात.तीव्रता कमी असल्यास केतकीचा अर्क 350 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.तीव्रता जास्त असल्यास इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून किंवा अॅासिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.

नाग अळी 

नाग अळी पानांवर सफेद रंगाच्या रेषा ओढते.नियंत्रणासाठी अबामेक्टिन 1.9 EC(अॅ/ग्री-मेक,व्हर्टीमेक) 6 ml/15 Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अॅनसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.

गाठी करणारे कीटक

हे किटक पिकातील मुळांवर गाठी तयार करतात. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.

 

रोग नियंत्रण

डाऊनी

डाऊनी (केवडा). पिवळसर, तांबूस होवून पाने सूकून जातात.नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.

भूरी

या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर 10 किलो/एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील

75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु,

फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP

(साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.

 

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

 ९९२३१३२२३३

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters