जमीन आणि पिके म्हटले म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारचे पोषक घटकांची नितांत आणि संतुलित प्रमाणात गरज असते. पिकांचा विचार केला तर मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम प्रकारातील अन्नद्रव्य देखील तितकेच महत्त्वाचे असतात.
यांचा नियमित आणि संतुलित पुरवठा होणे फार महत्त्वाचे असते. जेणेकरून जमिनीची सुपीकता देखील टिकून राहते आणि उत्पादन देखील चांगले येते. यासाठी वेगळ्या प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. या लेखामध्ये आपण जिप्सम या भू सुधारकाची माहिती घेणार आहोत.
जिप्समचे शेतीतील महत्व
एकंदरीत पिकांना आपण एन पी के जास्त प्रमाणात वापरतो. परंतु हे करीत असताना कॅल्शियम तसेच सल्फर यांच्या वापराकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. त्यामुळे जमिनीमध्ये सल्फर व कॅल्शियमची कमतरता भासत असल्यामुळे तसेच कॅल्शियमची भूमिका ही जमिनीसाठी फार महत्त्वाची असते. त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो. जिप्सम लाच रासायनिक भाषेत कॅल्शियम सल्फेट असे म्हणतात. यामध्ये ते 23.3 टक्क्यांपर्यंत कॅल्शियम आणि 18.50 टक्के सल्फर असते.
नक्की वाचा:बैलगाडा शर्यतींचा थरार! नगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत राळेगण थेरपाळला भरणार
जमिनीमध्ये जिप्सम कमी असल्याची लक्षणे
1- कॅल्शियमची कमतरता असेल तर पानांचा काही भाग पांढरा होतो.
2- पिकांची पाने आकसतात व मोडतात.
3- जर कॅल्शियम ची जास्त प्रमाणात कमतरता असेल तर पिकांची वाढ देखील खुंटते.
4- पिक वाळायला लागते.
जिप्समची वापर करण्याची पद्धत
1- पिकांची पेरणी करण्यापूर्वी जमिनीत द्यावे.
2- जिप्सम देण्यापूर्वी जमीन दोन-तीन वेळा नांगरून घ्यावी. त्यानंतर जमिनीत मिसळावे.
3- प्रति हेक्टर 10 ते 20 किलो कॅल्शिअम भात व 15 किलो कॅल्शिअम कडधान्य जमिनीमधून घेतात.
जिप्सम वापरण्याचे फायदे
1-जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मदत करते.
2-जमीन भुसभुशीत होते.
3- क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम च्या वापरामुळे सुटे होतात. त्यामुळे ते बाहेर फेकले जातात व जमिनीची प्रत सुधारते.
4- बियाण्याची उगवण चांगली होते.
5- पाण्याबरोबर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
6- जमिनीची धूप थांबवायला मदत होते.
7- पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
8- जमिनीतले कॅल्शियम मॅग्नेशियम चे प्रमाण सुधारते.
9- सेंद्रीय पदार्थांत लवकर कुजतात.
10- जिप्सम मुळे पिकांची अन्नद्रव्ये शोषण क्षमता वाढते.
11- फळबागेमध्ये वापर केल्यास फळांची गुणवत्ता सुधारते.
12- भुईमूग, टोमॅटो, बटाटा आणि कलिंगड सारख्या पिकांमध्ये वापर केल्यास पिकांची गुणवत्ता सुधारते हे सिद्ध झाले आहे.
13- जमिनीत वाढणाऱ्या कंदवर्गीय पिकांसाठी जिप्समचा खूप उपयोग होतो. त्यामुळे माती कंद पिकाला चिटकत नाही.
14- हुमनी आळी चे नियंत्रण होते.
15- जिप्सम मुळे पीक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकते.
Share your comments