आंतरपीक पद्धती म्हणजे एकाच शेतात एका वेळी एक किंवा दोन पिके एका निश्चित ओळीमध्ये लागवड करण्याच्या पद्धतीला आंतरपीक पद्धती असे म्हणतात हे आपल्याला माहितीआहे.जर आपण आंतरपीक लागवड पद्धतीचा विचार केला तर अगोदर ती कोरडवाहू प्रदेशांमध्ये जास्त प्रमाणात केला जायचा.
कारण कोरडवाहू प्रदेशांमध्ये पिकांचे नुकसान होण्याचा धोका जास्त असल्याने तो धोका कमी व्हावा यासाठी ही पद्धत अवलंबलीजात असे. परंतु आता आंतरपीक पद्धतीचा वापर हा उत्पादकतेत वाढ व उत्पादनामध्ये स्थिरता यावी यासाठी प्रामुख्याने केला जातो. आंतरपीक पद्धती शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. परंतु ही पद्धत अवलंबितांना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण आंतर पीक पद्धतीचे फायदे व मर्यादा तसेच महत्वाच्या बाबी यांची माहिती घेणार आहोत.
आंतरपिकांची निवड करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी….
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्य पिकांमध्ये आंतरपिकांची निवड करताना दोघ पिकांच्या वाढीच्या
अवस्थेमध्ये फरक असणे आवश्यक असते. सोबतच घटक पिकांच्या वाढीच्या अवस्था तसेच पोषक द्रव्यांच्या सर्वांचे मागणीचा जो वेळ आहे दोघा पिकांचा एकाच वेळी येऊ नये.
2- मुख्य पीक म्हणून ज्वारी, गहू आणि मकासारख्या तृणधान्यांचा वापर करावा किंवा नगदी पिकांमध्ये उस, कापसासारखे पिकांचा वापर करावा.
3- आंतरपीक म्हणून कडधान्ये किंवा तेलबियांचा वापर करणे फायद्याचे ठरते. कारण कडधान्यांची लागवड केली तर वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण करून मुख्य पिकाला ते उपलब्ध करून देतात. एवढेच नाही तर जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी देखील मदत होते व पाण्याचा ताण बसतात तरी मातीतील ओलाव्याचा चांगला नक्की वाचा:बेकरी उद्योग टाकायचा आहे? पण लागणाऱ्या यंत्रांची माहिती नाही, तर वाचा यंत्राविषयी सविस्तर माहिती
करतात.
4- तसेच पिकांची निवड करताना ते अशी करावी की, ते जमिनीतील वेगवेगळ्या खोलीवरूनवेगळ्या प्रकारची पोषक द्रव्य शोषून घेऊ शकतील.त्यासाठी पिकांच्या मुळांच्या प्रकारांमध्ये फरक असावा.
5- तसेच पिकांची पाण्याची गरज वेगळीवेगळी असावी.
6- घटक पिकांमध्येसूर्य प्रकाशासाठी असलेली स्पर्धा कमी असावी.
7-घटक पिकांच्या कापणीस येण्याच्या कालावधीत किमान 30 दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे.
आंतरपीक पद्धतीचे फायदे
1-आंतरपीक पद्धतीत एकल शेतीपेक्षा प्रति हेक्टर जास्त उत्पादन व उत्पन्न मिळते.
2- एखाद्या वर्षातच दुष्काळ किंवा अतिवृष्टीया सारख्या परिस्थितीत पिके अपयशी ठरण्या पासून बचाव होतो.
3- जमिनीची धूप व अवधाव कमी होतो तसेच तणांचा प्रादुर्भाव देखील मर्यादित राहतो.
4-या पद्धतीमध्ये संसाधने अधिक कार्यक्षमतेने वापरली जातात.
5- जर ऊस आणि कपाशी सारख्या नगदी पिकामध्ये आंतरपीक घेतले तर ते अधिक फायदेशीर ठरतात.
आंतर पीक पद्धतीच्या मर्यादा किंवा तोटे
1-वेगवेगळे लागवड पद्धती असलेल्या आंतरपिकांचे व्यवस्थापन हे अवघड व जिकिरीचे असते.
2- तसेच यंत्र किंवा सुधारित अवजारांचा उपयोगव्यवस्थित व प्रभावीपणे करता येत नाही.
3- तसेच घटक पिकांचा खते व सिंचनाला प्रतिसाद वेगवेगळा असल्यानेत्यांचे नियोजन योग्य करावे लागते.
4- पिकांच्या काढणित व कापणीत अडथळे निर्माण होऊ शकतात. पिकांची गुणवत्ता देखील घसरू शकते.
Share your comments