1. कृषी व्यवसाय

बेकरी उद्योग टाकायचा आहे? पण लागणाऱ्या यंत्रांची माहिती नाही, तर वाचा यंत्राविषयी सविस्तर माहिती

जागतिक पातळीवर बेकरी उद्योग हा प्राचीन काळापासून चा उद्योग असून भारतामध्ये परकीय व्यापाऱ्यासोबत तो आला. प्रामुख्याने इंग्रजांच्या आहारामध्ये बेकरी उत्पादनाचा वापर अधिक होता.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
useful machinary in backery udyog

useful machinary in backery udyog

जागतिक पातळीवर बेकरी उद्योग हा प्राचीन काळापासून चा उद्योग असून भारतामध्ये परकीय व्यापाऱ्यासोबत तो आला. प्रामुख्याने इंग्रजांच्या आहारामध्ये बेकरी उत्पादनाचा वापर अधिक होता.

सुरुवातीला बेकरी उत्पादनांना भारतीय लोक पाळत असले तरी पुढे हळूहळू त्यांचा प्रसार वाढत गेला. भारताचा बेकरी उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक असून, सुमारे 82 टक्के बेकरी उत्पादने भारतामध्ये तयार होतात.

  • बेकरी उत्पादने कशाला म्हणावे?

 विविध धान्यांची पिठे भिजवून,मळून,तिबंली जातात. ती यिस्टसह विविध प्रकारे अंबावून भट्टीमध्ये भाजले जातात. अशाप्रकारे तयार केलेल्या खाद्यपदार्थांना बेकरी उत्पादने म्हणतात.

 बेकरी प्रक्रिया उद्योगामध्ये प्राधान्याने पाव, ब्रेड, केक,पेस्ट्रीज, खारी, कुकीज,डोनटस यांसारखे पदार्थ बनवले जातात . या पदार्थांची चव कुरकुरीतपणा व रंग आकर्षक असून तेसहज पचन योग्य असतात. या दोन्ही कारणांमुळे बेकरी उत्पादनाकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात पूर्वी या व्यवसायामध्ये मैदा विविध प्रकारच्या चरबी फॅट यांचा वापर होत असे त्यामुळे आरोग्यासाठी जागरूक लोकांकडून या आहाराला पर्याय शोधला जात होता. मात्र अलीकडे अधिक आरोग्यदायक उत्पादनासाठी कमी ट्रान्स फॅट आणि कमी कॅलरी ऊर्जा असणाऱ्या सामग्रीचा वापर वाढू लागला आहे. त्यामध्ये बहुधान्य आणि संपूर्ण गहू असलेली नाविन्यपूर्ण उत्पादनाचा वापर वाढत आहे. त्यासोबत बहुतेक बेकरी उत्पादनांमध्ये तृणधान्यांच्या पिठात जीवनावश्यक पोषणद्रव्येही मिसळली जाऊ लागली आहेत. संतुलित पोषणाच्या दृष्टीने नैसर्गिक पदार्थ सोबत लोह, कॅल्शियम, प्रथिने या पोषणमूल्यांचा वापर केला जातो.

  • बेकिंग ओव्हन :-

बेकिंगओव्हनहे सिंगल व डबल डेकर मध्ये उपलब्ध आहे. बेकिंग ओव्हनहे गॅस व इलेक्ट्रिकवरही चालतात.सिंगल डेक ओव्हन ची साधारण किंमत ही 50 हजार रुपये तर डबल डेकओव्हनकिंमत सुमारे एक लाखापर्यंत आहे. डबल डेक गॅस ओव्हनयाची क्षमता चार ट्रेसाईज 16 बाय 24 इंच असून, ते 220 होल्ट सिंगल फेज वर चालते. त्याला 0.2 किलो वाट ऊर्जा लागते. याचीसाधारण किंमत एक लाख रुपये आहे.

  • बेकरी मिक्सर :-

) डव मिक्सर ( कणिक तिंबण्याचेयंत्र):- हे यंत्र मोठ्या प्रमाणामध्ये पीठ मळणे व उंडे बनविण्यासाठी वापरले जाते.यात दोन प्रकार असून,स्पायलर डव्हमिक्सर चा उपयोग ब्रेड, टोस्टखारी बनविण्यासाठी केला जातो. स्पायलर डव्हमिक्सर मध्ये सुमारे 10 किलोपर्यंत पीठ मळता  येते. या स्पायासर डव्हमिक्सर मध्ये डबल स्पीड ॲटोमॅटीक टायमर चेंज होतो. हे दोनशे वीस होल्ट सिंगल फेज वर चालते. याला 0.2 ते 0.75 किलो  वाटइतकी ऊर्जा लागते. त्याचा मिसळण्याचा वेग 100 ते 185  फेरेप्रति मिनिट (आर.पी.एम.) व ब्राउलस्पीड  10 ते 16फेरेप्रतिमिनिट इतका आहे. या यंत्राचे वजन 80 किलो आहे. यामध्ये 10 किलोची बॅच  एकावेळी बनविता येते.

) प्लॅनेटरी फुड मिक्सर :- याचा वापर बिस्कीट केक कुकीज तयार करण्यासाठी होतो. प्लॅनेटरी फुड मिक्सर 220 होल्ट सिंगल फेज वर चालतो. याचे वजन 56 किलो असून, यामध्ये 4 किलो पर्यंतच पीठमळतायेते. त्याची किंमत सुमारे 45 हजार रुपये आहे.

  • ब्रेड स्लायसर :- याद्वारे तयार केलेल्या ब्रेडचे काप तयार करता येतात. त्यामध्ये सरासरी 28 ब्लेड असून, 220 व्होल्टेज वर चालते.त्यासाठी सुमारे 25 किलो वाट ऊर्जा लागते. कापाची जाडी 12 एम.एम. पर्यंत ठेवता येते. किंमत सुमारे 34 हजार रुपये आहे.
  • मोल्ड (साचे) :- ब्रेड मोल्ड हे सिलिकॉन, ॲल्युमिनियम पासून बनवले जातात. यामध्ये आपण 200 ग्रॅम, 500 ग्रॅम,1000 ग्रॅम, चे ब्रेड लोफतयार करता येतात. एका मोल्ड ची किंमत बाजारामध्ये 200 रुपये पासून सुरू होते.
  • प्रूफिंग चेंबर :-प्रूफिंग किन्वणाचीप्रक्रिया घडवली जाते. याला उर्जा पुरविण्यासाठी विद्युत ऊर्जा किंवा गॅसचा वापर शक्य आहे. यामध्ये 35 ते 43 अंश सेल्सिअस तापमानामध्ये यिस्ट कार्यान्वित केले जाते.
  • किन्वन प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यासाठी 35 ते 43 अंश सेल्सिअस तापमान 40 ते 70 मिनिटे ठेवले जाते. याची किंमत सुमारे 50 हजार रुपये पासून पुढे आहे.
  • सिलिंग मशीन :- उत्पादने तयार झाल्यानंतर त्याला पॉलिथिन पिशव्या मध्ये पॅकिंग करण्यासाठी सिलिंग मशीन वापरली जाते. याची किंमत 1500 रुपयांपासून सुरू होतात. ॲल्युमिनियम पासून बनवलेल्या यंत्राला 230 होल्ट ऊर्जा लागते.
English Summary: this crucial information about main machinary in backery udyog Published on: 10 March 2022, 06:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters